पारनेरमध्ये औटी विरूद्ध लंके निवडणूक : शहर विकास आघाडीनेही लावली ताकद

पारनेर ( Parner ) नगर पंचायतीत माजी आमदार विजय औटी ( Vijay Auti ) यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेना ( Shivsena ) उमेदवार विरूद्ध आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP ) उमेदवार अशी सरळ लढत होणार आहे.
Vijay Auti Vs Nilesh Lanke

Vijay Auti Vs Nilesh Lanke

Sarkarnama

Published on
Updated on

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील तीन नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. यात पारनेर नगरपंचायतीचा समावेश आहे. आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे आता लढती स्पष्ट झाल्या आहेत. 17 पैकी 13 प्रभागांची निवडणूक होत असून एकही जागा बिनविरोध नाही. भाजप व काँग्रेस प्रत्येकी एक जागा लढवित आहे. त्यामुळे पारनेर ( Parner ) नगर पंचायतीत माजी आमदार विजय औटी ( Vijay Auti ) यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेना ( Shivsena ) उमेदवार विरूद्ध आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP ) उमेदवार अशी सरळ लढत होणार आहे. Lanke vs Auti in Parner: City Development Front also takes the field

शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांच्या पत्नी जयश्री औटी प्रभाग 9मधून निवडणूक लढवित आहेत. या प्रभागात शिवसेनेच्या जयश्री औटी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या हिमानी नगरे अशी सरळ लढत होणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस व भाजपने प्रभाग पाच बाय दिला आहे. त्यामुळे या प्रभागात शहर विकास आघाडीचे चंद्रकांत चेडे विरूद्ध अपक्ष उमेदवार नितीन अडसुळ अशी लढत होईल. शहर विकास आघाडीने 10 प्रभागांत उमेदवार दिले आहेत. राष्ट्रवादी व शिवसेने प्रत्येकी 12 जागांवर उमेदवार दिले आहेत. शहर विकास आघाडी किती मते घेते यावर या लढतीचे बरेचसे भवितव्य ठरण्याची चिन्हे आहेत.

Vijay Auti Vs Nilesh Lanke

आमदार नीलेश लंके व विजय औटी यांची प्रतिष्ठेची लढाई

आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 21 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे 13 जागांसाठी 42 उमेदवार आपले नशिब आजमाविणार आहेत. या निवडणुकीत एकही प्रभागाची निवडणूक बिनविरोध झालेली नाही. त्यामुळे 13 जागांवर लढती होणार आहेत.

Vijay Auti Vs Nilesh Lanke

नीलेश लंके म्हणाले, मी पाकिस्तानातून आलोय का ?

यांनी घेतले आज घेतली माघार

प्रभाग 1 - विजया सोबले, उषा सोबले, प्रभाग 3 - सुनील गाडगे, प्रभाग 4 - विवेक शेरकर, प्रभाग 5 - ऋषीकेश चेडे, प्रभाग 6 - शकुंतला चेडे, प्रभाग 7 - प्रियंका परदेशी, प्रभाग 8 - नीलेश लोहकरे, प्रभाग 9 - वर्षा नगरे, सचिन नगरे, स्वरूप जेउरकर, विलास मते, अमित जाधव, शरद नगरे, वैभव श्रीमंदिलकर, प्रभाग 10 - स्वाती गाडगे, प्रभाग 15 - सुलताना शेख, प्रभाग 16 - मनिषा पठारे, यशवंत पठारे, संतोष भिसे, प्रभाग 17 - सुवर्णा औटी

Vijay Auti Vs Nilesh Lanke

कोण म्हणतं मी राजकारणातून बाजूला गेलो : विजय औटी

अशा होणार लढती

प्रभाग 1 - शीतल म्हस्के (शहर विकास आघाडी), प्रियंका सोबले (अपक्ष), शालूबाई ठाणगे (शिवसेना), वैशाली औटी (राष्ट्रवादी)

प्रभाग 3 - अजित देशमाने (शहर विकास आघाडी), नितीन औटी (शिवसेना), योगेश मते (अपक्ष), दगडू शेरकर (राष्ट्रवादी)

प्रभाग 4 - गणेश वैद्य (शहर विकास आघाडी), नवनाथ सोबले (शिवसेना), विजेता सोबले (राष्ट्रवादी)

प्रभाग 5 - चंद्रकांत चेडे (शहर विकास आघाडी), नितीन अडसुळ (अपक्ष)

प्रभाग 6 - आशा चेडे (शहर विकास आघाडी), रोहिणी औटी (शिवसेना), नीता औटी (राष्ट्रवादी)

प्रभाग 7 - मालन शिंदे (शहर विकास आघाडी), जमुना परदेशी (अपक्ष), विद्या गंधाडे (शिवसेना), उषा खोसे (राष्ट्रवादी), वर्षा जाधव (अपक्ष), अनिता डेंगळ (काँग्रेस)

प्रभाग 8 - भुषण शेलार (शहर विकास आघाडी), संतोष लोहकरे (शिवसेना), अश्विनी सोनवणे (राष्ट्रवादी)

प्रभाग 9 - जयश्री औटी (शिवसेना), हिमानी नगरे (राष्ट्रवादी)

प्रभाग 10 - सुरेखा भालेकर (शहर विकास आघाडी), इंतियाज राजे (शिवसेना), सुरेखा चेडे (राष्ट्रवादी)

प्रभाग 12 - डॉ. विद्या कावरे (राष्ट्रवादी), रेणुका रूईकर (शिवसेना), सुनंदा शेरकर (भाजप)

प्रभाग 15 - सविता ठुबे (शहर विकास आघाडी), जायदा शेख (शिवसेना), अंजुम शेख (राष्ट्रवादी)

प्रभाग 16 - रविंद्र खेडेकर (अपक्ष), युवराज पठारे (शिवसेना), महेश औटी (राष्ट्रवादी)

प्रभाग 17 - अनिता मोढवे (शिवसेना), ममता औटी (शहर विकास आघाडी), प्रियंका औटी (राष्ट्रवादी)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com