Solapur Airlines : सोलापूर ते तिरुपती विमानसेवा लवकरच सुरू करणार; केंद्रीय मंत्री मोहोळ यांची घोषणा

Murlidhar Mohol Announcement : येत्या 23 डिसेंबरला सोलापूर ते मुंबई आणि सोलापूर ते गोवा ही विमानसेवा सुरू होत आहे, त्यासाठी फ्लाय-91 विमान कंपनी पुढाकार घेत आहे.
Murlidhar Mohol
Murlidhar Mohol Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 16 November : येत्या 23 डिसेंबर रोजी सोलापूर ते मुंबई आणि सोलापूर ते गोवा अशी विमानसेवा सुरू होत आहे. याशिवाय पुढील काळात ‘उडान’ योजनेच्या माध्यमातून सोलापूर ते तिरुपती अशी विमानसेवा आपण सुरू करणार आहोत. बोरामणी विमानतळासाठीही आम्ही विचार सुरू केलेला आहे. मात्र, माळढोक पक्षामुळे तो विषय थांबला आहे, त्यातून मार्ग काढला जाईल, असे केंद्रीय हवाई वाहतूक राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) हे आज भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सोलापुरात आले होते. मोहोळ यांनी दुधनी आणि बोरामणी येथे सभा घेतल्या. त्या सभेनंतर माध्यमांशी बोलताना मोहोळ यांनी सोलापूरच्या विमानसेवेबाबत माहिती दिली.

ते म्हणाले की, एकेकाळी युद्ध सामग्री आयात करणारा देश ते 80 देशांना युद्ध सामग्री पुरवणारा देश अशी ओळख आपण निर्माण केली आहे. राज्य सरकार म्हणून आम्ही फक्त संकल्पपत्र ठेवणार नसून सत्यात उतरवू. मागच्या 10 वर्षांत विमानतळं 74 हून 157 झाली आहेत.

तब्बल 65 कोटी रुपये खर्चून सोलापूर विमानतळ (Solapur Airport) सुरू करण्यात आलं आहे. येत्या 23 डिसेंबरला सोलापूर ते मुंबई आणि सोलापूर ते गोवा ही विमानसेवा सुरू होत आहे, त्यासाठी फ्लाय-91 विमान कंपनी पुढाकार घेत आहे. सोलापुरातून विमान सेवा सुरु करण्यासाठी vgf च्या माध्यमातून राज्य सरकार आपल्याला मदत करत आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Murlidhar Mohol
Ajit Pawar : बबनदादांच्या अपक्ष लढण्याच्या निर्णयावर अजितदादांनी प्रथमच व्यक्त केली नाराजी

सोलापुरातील पुढील विमानसेवा ही उडान योजनेच्या माध्यमातून सुरु करणार आहोत. त्याच माध्यमातून आपण सोलापूर ते तिरुपती ही विमानसेवा सुरू करणार आहोत. या शिवाय, बोरामणी विमानतळाच्या विकासाचाही आम्ही विचार केला आहे. मात्र, माळढोक पक्षामुळे तो विषय थांबला आहे, त्यातून मार्ग काढला जाईल, असे आश्वासन मुरलीधर मोहोळ यांनी दिले.

साखर कारखान्यांना लागणार इनकम टॅक्स माफ करण्याचं काम आमच्या सरकारने केलं आहे. रमेश पोटभरे या नागपूरमधील कनद्रे गावाच्या शेतकऱ्याचं वीजबिल माफ झालं, त्यांचं बिल मुरलीधर मोहोळ यांनी दाखवून उदाहरण दिलं. तसेच, सक्तीच्या धर्मांतर विरोधी कायदा आम्ही आगामी काळात करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

Murlidhar Mohol
Ajit Pawar : मी सोशल इंजिनिअरिंग केलंय; सगळ्यांना एका चष्म्यातून बघू नका : अजितदादांचे सूचक विधान

सोलापूर मुंबई आणि सोलापूर-गोवा विमानसेवेचे वेळापत्रक

मुंबईहुन 11:55 ला निघेल

सोलापुरात 01:45 ला पोहचेल

सोलापुरातून 09:40 ला निघेल

मुंबईला 11:20 ला पोहचेल

गोव्यातून सकाळी 08 वाजता निघेल

सोलापुरात 9:10 ला पोहचेल

सोलापुरातून 02:15 ला निघेल

गोव्यात 03:30 ला पोहचेल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com