Laxman Dhoble : लक्ष्मण ढोबळेंचा अजितदादांना सल्ला; म्हणाले, ‘अर्थमंत्रालयाच्या ‘त्या’ फाईलवर सही करा, ती फायदेशीर ठरेल’

CM Ladki Bahin Yojana : हवं तर आमची पेन्शन बंद करा; पण लाडक्या बहिणीला 2100 रुपये द्या, अशी विनंती लाडक्या बहिणींच्या मतांवर सत्ता स्थापन केलेल्या सत्ताधारी पक्षाच्या 225 आमदारांनी केली पाहिजे.
Ajit Pawar-Laxman Dhoble
Ajit Pawar-Laxman DhobleSarkarnama
Published on
Updated on

Mangalvedha, 30 March : माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी लाडकी बहीण योजनेवरून अजित पवार यांना पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीजवळ जाऊन पश्चाताप करण्यापेक्षा अर्थमंत्रालयाने सादर केलेल्या 2100 रुपये लाडक्या बहिणीला देण्याच्या फाईलवर सही करून पश्चाताप व्यक्त करा, तो अधिक फायदेशीर ठरेल, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष ढोबळे यांनी दिला.

भैरवनाथ उद्योग समूहाचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांच्या संपर्क कार्यालयाचे मंगळेवढ्यात उद्‌घाटन करण्यात आले. त्या कार्यक्रमात बोलताना लक्ष्मण ढोबळे (Laxman Dhoble ) यांनी लाडकी बहीण योजनेवरून उपमुख्यमंत्री अजित यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, खिशाचा पेन विकला तरी चालेल. पण, लाडकी बहिणीला 2100 रुपये देऊ, असे अजितदादांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सांगितले होते, त्यामुळे त्यांनी अर्थमंत्र्यालयाने तयार केलेल्या 2100 रुपये देण्याच्या फाईलवर सही करावी.

‘हवं तर आमची पेन्शन बंद करा; पण लाडक्या बहिणीला (Ladki Bahin Yojana) 2100 रुपये द्या, अशी विनंती लाडक्या बहिणींच्या मतांवर सत्ता स्थापन केलेल्या सत्ताधारी पक्षाच्या 225 आमदारांनी केली पाहिजे, अशी अपेक्षाही ढोबळे यांनी व्यक्त केली.

Ajit Pawar-Laxman Dhoble
Jaykumar Gore : ...तेव्हा बारामतीकरांच्या छातीत सर्वांत पहिल्यांदा कळ आली; पण, मी बारामतीच्या पुढं कधी झुकलो नाही अन्‌ झुकणारही नाही : जयकुमार गोरेंचा इशारा

ढोबळे म्हणाले, मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी भविष्यात संघर्ष करावा लागेल. प्रसंगी दामाजीपंतांसारखे अधिकाऱ्यांना हात जोडून सर्वसामान्यांच्या प्रश्नाची सोडवणूक केली जाईल. सध्या सुमारे 70 महामंडळाचे कामकाज बंद आहे. तसेच, शिक्षकांचेही पगार थांबलेले आहेत. त्यावरून महामंडळाच्या माध्यमातून सरकारला जनतेची काळजी होती की, या महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या पगाराची काळजी होती, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

मुलं माझी आहेत, बायको माझी नाही, असे न्यायालयात सांगणाऱ्या धनंजय मुंडे यांच्यावर ढोबळे यांनी नाव न घेता निशाणा साधत ‘चिनी बाजारातील वस्तूसारखी बायकोला माझी नव्हं म्हणून सांगणं, हे बरं नाही, ते 376 ला धरून होतंय, असा टोलाही लगावला.

Ajit Pawar-Laxman Dhoble
Loan waiver : शिवसेना नेत्याने सांगितली कर्जमाफी मिळविण्याची अफलातून आयडिया; शिंदे मनावर घेणार का? (Video)

अडचणीच्या काळात मुस्लीम समाजाच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली आहे, असेही प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण ढोबळे यांनी स्पष्ट केले. या वेळी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष ॲड नंदकुमार पवार, राहुल शहा, चंद्रशेखर कोंडूभैरी, प्रा. येताळा भगत, राहुल घुले उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com