Lok Sabha Election 2024 : अखेर चंद्रहार पाटलांचं ठरलं; निवडणुकीच्या आखाड्यात कुणाला करणार चितपट?

Chandrahar Patil News : पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यांच्या उमेदवारीला प्रकाश आंबेडकरांनीही पाठिंबा दिला आहे.
Chandrahar Patil, Uddhav Thackeray
Chandrahar Patil, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Sangli News : सांगली लोकसभा मतदारसंघासाठी (Lok Sabha Election 2024) महाविकास आघाडीमध्ये टशन सुरू असतानाच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील सोमवारी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. सेनेतील प्रवेशासाठी चंद्रहार पाटलांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील प्रवेशासाठी जिल्ह्यातून तब्बल 500 गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या कारणांनी सांगलीची काँग्रेसची जागा शिवसेनेला सुटण्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील वाद विकोपाला जाण्याची चिन्हे आहेत. 

मागील चार महिन्यांपासून चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. कोणत्याही परिस्थितीत लोकसभा लढवण्याचा चंग बांधल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या (VBA) संपर्कातही ते होते. मात्र, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या बदल्यात सांगली मतदारसंघ (Sangli Constituency) शिवसेनेला (ठाकरे गट) द्यावा, अशी भूमिका गटाने घेतल्यानंतर चंद्रहार पाटलांना मातोश्रीवर बोलवण्यात आले होते. तेथे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली होती, तेथील चर्चेनंतर महाविकास आघाडीकडून सांगलीची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात होते, परंतु काँग्रेस नेतेही सांगलीसाठी आग्रही राहिल्याने कोंडी निर्माण झाली होती.

Chandrahar Patil, Uddhav Thackeray
Solapur Politics : लोकसभेआधीच उडाला विधानसभेचा खटका; सोलापुरात कोठे-देशमुख समर्थकांत हाणामारी

अखेर चंद्रहार पाटील यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश निश्चित झाला आहे. ते मुंबईत सोमवारी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सेनेत प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर चंद्रहार यांच्यासह कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी सुरु केली आहे. जिल्ह्यातून सुमारे 500 गाड्या मुंबईकडे रवाना करण्याचा चंग बांधला आहे. त्याबाबतचे नियोजन करण्यात येत आहे. चंद्रहार यांच्या जवळचे कार्यकर्ते प्रत्येक तालुक्यातून  मुंबईला गाड्या नेण्याबाबतचे नियोजन करीत आहेत. रविवारी रात्री चंद्रहार यांच्यासह सर्व कार्यकर्ते मुंबईकडे रवाना होतील.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार यांच्या शिवसेनेत प्रवेश होत असताना सांगली लोकसभा मतदारसंघ जागा शिवसेना ठाकरे गट लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे. ठाकरे यांनी सांगलीतून शिवसेनेकडून चंद्रहार पाटलांच्या नावाला समंती दर्शवली असल्याची माहिती आहे. वंचित बहुजन आघाडीनेही चंद्रहार पाटील यांना पाठिंबा देत सांगली लोकसभा मतदारसंघातील आपली भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली आहे. महाविकास आघाडीमध्ये (MahaVikas Aghadi) ठाकरे गटाला जागा गेल्यास काँग्रेसची भूमिका नेमकी काय राहणार याबाबतही तर्कवितर्क लढविले जात आहेत. 

काँग्रेसचे (Congress) प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघात गतवेळी झालेल्या पराभव विसरुन जोरदार तयारी केली आहे. निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी अनेक कार्यक्रम घेऊन वातावरण निर्मिती केली. आता काँग्रेसचा हक्काचा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्यास महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

Chandrahar Patil, Uddhav Thackeray
Lok Sabha Election 2024 News : कोल्हापुरातील दोन अपक्ष आमदार महायुतीवर नाराज ? मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात व्यक्त केली खंत

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com