Lok Sabha Election 2024 News : कोल्हापुरातील दोन अपक्ष आमदार महायुतीवर नाराज ? मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात व्यक्त केली खंत

Political News : लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीला पाठिंबा देणाऱ्या कोल्हापुरातील अपक्ष आमदारांची नाराजी पहायला मिळत आहे.
CM Eknath shinde
CM Eknath shinde Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील तीन पैकी दोन अपक्ष आमदार नाराज आहेत. कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांनी नाराजी व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्हाला कोणत्याच चर्चेत सहभागी करून घेत नसल्याची खंत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यक्त केली. दरम्यान, विमानतळ येथील टर्मिनल इमारतीचे उद्घाटन पार पडल्यानंतर त्यातील एका आमदाराने तात्काळ तिथून काढता पाय घेतला.

लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीला पाठिंबा देणाऱ्या कोल्हापुरातील अपक्ष आमदारांची नाराजी पहायला मिळत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यात जिल्ह्यातील तीन पैकी दोन अपक्ष आमदारांनी नाराजी व्यक्त करत आमच्या भावना वरिष्ठापर्यंत पोहचवा, अशी विनंती केली. (Lok Sabha Election 2024 News )

(राजकारणाती

CM Eknath shinde
Ravindra Waykar In Shivsena : ठाकरेंचा आणखी एक ताकदवान आमदार फुटला? रवींद्र वायकर शिंदेंच्या गळाला?

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात तीन अपक्ष आमदार आहेत. त्यातील दोन अपक्ष आमदारांनी रविवारी टर्मीनल इमारतीचे उदघाटन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीवेळी त्यांनी आपली नाराजी व्यक्त करून दाखवली.

सध्या लोकसभा निवडणुकीच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. आम्ही महायुतीसोबत आहोत पण महायुतीतील काही इच्छुक आम्हाला कोणत्या चर्चेत सहभागी करून घेत नसल्याची खंत यावेळी दोन अपक्ष आमदारांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे बोलून दाखवली.

दरम्यान, या सर्व प्रकरणावर राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांची प्रतिक्रिया घेतली. या प्रकराबद्दल माझ्यापर्यंत काही माहिती आलेली नाही. जर तसे काही असल्यास भाजपच्या वरिष्ठासोबत चर्चा करू, लवकरच त्यांची नाराजी दूर केली जाईल, असे आश्वासन राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.

ल महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तीन पैकी दोन आमदारांचा भाजपला पाठिंबा

तीन पैकी दोन आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामध्ये इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade) आणि पन्हाळा शाहूवाडीचे आमदार विनय कोरे (Vinay Kore) यांचा समावेश आहे. शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा देणारे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर (Rajendra Patil) हे आहेत.

(Edited By : Sachin Waghmare)

CM Eknath shinde
Eknath Shinde: जिल्हाधिकाऱ्यांसाठी गुड न्यूज: मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com