Devendra Fadnavis News : अकलूजमध्ये रणजितसिंह मोहिते-पाटलांचा पुष्पगुच्छ फडणवीसांनी स्वीकारला नाही

ranjitsinh mohite patil News : रणजितसिंह मोहिते-पाटील अद्यापही भाजपमध्येच आहेत.
ranjitsinh mohite patil Devendra Fadnavis
ranjitsinh mohite patil Devendra Fadnavissarkarnama

Solapur News : माढा मतदारसंघातून ( Madha Lok Sabha Election 2024 ) उमेदवारी डावलल्यानंतर मोहिते-पाटलांनी भाजपविरोधात ( Bjp ) बंड पुकारत 'तुतारी' हाती घेतली. धैर्यशील मोहिते-पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवत आहे. पण, विधानपरिषद आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपमध्येच आहेत. त्यातच मोहिते-पाटलांच्या अकलूज या बालेकिल्ल्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. सभेपूर्वी रणजितसिंह मोहिते-पाटील पुष्पगुच्छ घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी आले होते. मात्र, फडणवीस यांनी रणजितसिंह मोहिते-पाटलांच्या पुष्पगुच्छाचा स्वीकार केला नाही.

धैर्यशील मोहिते-पाटील ( Dhairyasheel Mohite Patil ) माढ्यातून लढण्यास इच्छुक होते. परंतु, भाजपनं विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना ( ranjitsinh naik nimbalkar ) पुन्हा तिकीट दिलं. भाजपकडून डावलण्यात आल्यानंतर जयसिंह मोहिते-पाटील यांनी माढ्यातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली. त्यानुसार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून माढ्यातून लोकसभेचा उमेदवारी अर्जही भरला आहे. मात्र, हा निर्णय घेत असताना मोहिते-पाटील कुटुंबीयांमध्येही मतभेद होते, हे तेव्हाही दिसून येत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विजयसिंह मोहिते-पाटील ( Vijaysinh Mohite Patil ) हे धैर्यशील यांच्या प्रचारसभांमध्ये दिसत आहेत. पण, रणजितसिंह मोहिते-पाटील ( ranjitsinh mohite patil ) यांचा ओढा अद्यापही भाजपकडेच आहे. भाजपमध्ये असले तरी रणजितसिंह मोहिते-पाटील निंबाळकर यांच्या प्रचारात सहभागी झाले नाहीत. तसेच, धैर्यशील मोहिते-पाटील यांच्याही प्रचारात रणजितसिंह हे सक्रिय नाहीत.

यातच रणजितसिंह निंबाळकर यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्या तीन सभा माढा लोकसभा मतदारसंघात झाल्या. अकलूजमधील सभेपूर्वी शंकरराव मोहिते-पाटील विद्यालयासमोर रणजितसिंह मोहिते-पाटील काही कार्यकर्त्यांसह देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी उभे होते. हे पाहून पोलिसांची पायलट गाडी थांबली. पण, फडणवीसांनी चालकाला पुढं जाण्यासाठी खुणावल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे रणजितसिंह मोहिते-पाटील यांचं पुप्षगुच्छ न स्वीकारताच फडणवीस सभेसाठी रवाना झाले. त्यामुळे फडणवीस रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जात आहे.

ranjitsinh mohite patil Devendra Fadnavis
Ranjeetsinha Naik-Nimbalkar : निंबाळकरांनी 50 वर्षांची हिस्ट्रीच काढली; धैर्यशील अन् रणजितसिंह मोहिते-पाटलांवर वार

निंबाळकरांचा रणजितसिंह-मोहिते-पाटील यांच्यावर निशाणा

याच घटनेचा आधार घेत खासदार निंबाळकरांनी रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे. "एवढी मदत करूनही गद्दारी केली. अकलूज चौकात फुलांचा गुच्छ घेऊन रणजितसिंह मोहिते-पाटील देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी उभे होते. पण, फडणवीस यांनी तो पुष्पगुच्छ स्वीकारला नाही. ते थेट सभेकडे आले. गद्दारांना माफी नाही. आता पक्ष त्यांची दखल घेणार नाही," असं म्हणत निंबाळकरांनी रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यावर तोफ डागली.

ranjitsinh mohite patil Devendra Fadnavis
ShahajiBapu Attack Mohite Patil : मोहिते पाटील आता मैदानात सापडलेत, त्यांना सोडायचं नाही; शहाजीबापूंचा हल्लाबोल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com