Hatkanangale Lok Sabha Election : धैर्यशील मानेंचे टेन्शन अण्णांनी वाढवलं; आमदार आवाडे हातकणंगलेतून लढणार...

MLA Prakash Awade News : हातकणंगलेची लढत पंचरंगी होणार, अपक्ष आमदारांनी वाढवला दबाव...
Hatkanangale Lok Sabhe Election
Hatkanangale Lok Sabhe ElectionSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत होण्याची शक्यता असताना महायुतीचे सहयोगी सदस्य आणि अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी 'राजकीय बॉम्ब' फोडून ही लढत पंचरंगी केली आहे. आज कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली उमेदवारी हातकणंगलेमधून घोषित केली आहे. कालच तीन अपक्ष आमदारांनी बैठक घेत राजकीय चर्चा घडवून आणल्याचे वृत्त आहे. अशातच आज आमदार प्रकाश आवाडे यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली. यामुळे हातकणंगलेची लढत अधिकच रंगतदार झाली आहे. (Latest Marathi News)

Hatkanangale Lok Sabhe Election
Prakash Mahajan News : 'हे धर्मयुद्ध आहे अन् राज ठाकरे श्रीकृष्णाच्या भूमिकेत' ; प्रकाश महाजनांचं विधान!

"हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणार आहे. या मतदारसंघात मी परिचित आहे. माझं काम संपूर्ण राज्यात माहिती आहे. कामासाठी माझ्या इचलकरंजीमधील एकही माणूस बाहेर जात नाही. हेच परिवर्तन संपूर्ण लोकसभा मतदारसंघात करणार आहे. एकदाच निवडणूक लढवणार आणि जिंकणारसुद्धा," अशा शब्दांत आमदार प्रकाश आवाडे यांनी विश्वास व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Hatkanangale Lok Sabhe Election
BJP Election 2024 Strategy: लोकसभेची खरी लढाई बूथवर; मैदानावरील सभेपेक्षा चौक सभा, बैठक घेण्यावर भाजपचा भर

"मतदारांनी संधी दिली तर खासदार कसा असतो? खासदार काय काम करू शकतो हे दाखवून देतो. मी कोणतीही बंडखोरी केली नाही किंवा मला कुणी उभे राहा, याबद्दल सांगितले नाही. अलीकडे कोण मत वाया घालवत नाही, जनता जनार्दन ठरवतील की कोण खासदार असावा. इथं जातीचे कार्ड चालणार नाही, कोण विकास करतो हे कार्ड चालणार आहे," अशा शब्दांत त्यांनी (Prakash Awade) विरोधकांना सुनावले आहे.

Hatkanangale Lok Sabhe Election
NCP Ajit Pawar Group: भाजपला जोर का झटका; भुजबळ नसतील तर अरींगळेंना द्या उमेदवारी!

काल अपक्ष आमदारांची बंद खोलीत चर्चा -

हातकणंगले लोकसभा (Lok Sabha) मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान खासदार धैर्यशील माने यांची उमेदवारी जाहीर झाली असली तरी सध्या भाजपसोबत असलेल्या नेत्यांची भूमिका अजूनही गुलदस्तात आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘जनसुराज्य’चे आमदार डॉ. विनय कोरे यांनी इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांची, तर आवाडे यांनी शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची भेट घेऊन चर्चा केली, तर तिघांनीही दोन तास बंद खोलीत चर्चा केल्याची माहिती आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com