Kolhapur News : राज्यातील आगामी लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीतील जागांचा तिढा सुटण्याचे नाव घेत नाही. शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेसकडून एकमेकांच्या विद्यमान जागांवर दावा केला जात आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसने दावा केल्यानंतर त्याची चर्चा राज्यात आहे. तर कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघ कोणाकडे जाणार याबाबत उत्सुकता लागून राहिले आहे. अशातच आज शिवसेना ठाकरे गटाने कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे शिवसेना जिल्हाप्रमुख आणि प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर ठाकरे गटाच्या एका नेत्याने कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ आमचाच आहे, असा ठाम दावा केला आहे. (Latest Marati News)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कोल्हापूर संपर्कप्रमुख अरुण भाई दुधवडकर यांनी पत्रकारांशी बोलताना, कोल्हापूर आणि हातकणंगले हे लोकसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाचा आहे. मुंबईत महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे. या बैठकीत कोल्हापूर, हातकणंगले जागा कोणाकडे जातील? हे पाहणे महत्त्वाचे आहे. आघाडीत (Mahavikas Aghadi) जो उमेदवार देतील. त्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतांच्या फरकाने विजयी करणार आहे. त्या अनुषंगाने आज कोल्हापूर शहरात आज शिवसेना जिल्हाप्रमुख आणि प्रमुख पदधिकाऱ्यांची बैठक पार पडली असल्याचे दूधवडकर यांनी सांगितले.
आम्हाला शाहू महाराज छत्रपती यांच्या बद्दल आदर आहे. कोल्हापूरचा उमेदवार हे महाविकास आघाडीतील प्रमुख आणि वरिष्ठ नेते ठरवतील. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील त्यासोबत आम्ही राहणार. कोल्हापूर (Kolhapur) आणि हातकणंगले जागा या शिवसेनेच्याच आहेत. शिवसेना ठाकरे गट राज्यातील 18 जागा लढणारच आहे. या 18 जागांमध्ये कोल्हापूर आणि हातकलंगले जागेचा समावेश आहे. मात्र वाटाघाटीत जो पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील त्यामागे आम्ही उभे राहणार, असा निर्धार केला असल्याचे दूधवडकर यांनी सांगितले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.