Kolhapur News : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महायुती कडून खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्रपणे या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून महाविकास आघाडी कडून शिवसेना ठाकरे गटाने या मतदारसंघातून उमेदवारांची शोधाशोध सुरू केली आहे. मात्र भाजपमध्ये असलेल्या महाडिक बंधूंना महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी संपर्क करून उमेदवारीची ऑफर दिली आहे. त्याबाबत अनेक नेत्यांनी संपर्क केला असून या घटनेमुळे राजकारणात भुवया उंचावल्या आहेत. (Latest Marathi News)
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून लढण्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी नकार कळवल्यामुळे महाविकास आघाडीतील काही नेत्यांच्याकडून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडिक यांच्याशी संपर्क साधला आहे. राहूल महाडिक हे भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष असून ते अडगळीत पडले आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात इस्लामपूर व शिराळा विधानसभा या दोन मतदारसंघांचा समावेश होतो. या दोन्ही मतदारसंघात राहुल महाडिक यांचा चांगला संपर्क आहे. राहुल महाडिक यांना राजकारणात सक्रीय रहायचे आहे. मात्र त्यांना या दोन्ही मतदारसंघात भाजपकडून कोणताही स्पेस मिळेल, अशी शक्यता नाही. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राहुल महाडिक व अजित पवार यांचीही मुंबई येथे भेट झाली होती.
मात्र त्यानंतर ते स्तब्धच आहेत. अलिकडे भाजपमध्ये ते एकाकी पडल्याचे दिसत आहे. त्यामुळे शेट्टी यांच्या नकारानंतर महाविकास आघाडीने हातकणंगले लोकसभा (Lok Sabha) मतदारसंघातील इच्छुकांशी संपर्क साधण्याचे काम सुरु केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून राहुल महाडिक यांच्याशी महाविकास आघाडीतील नेत्यांनी संपर्क साधला आहे. राहुल महाडिक भाजपला सोडचिठ्ठी देवून महाविकास आघाडीकडे झुकतात की काय ? हे येत्या दोन तीन दिवसात समजेल. महाडिक यांचा इस्लामपूर व शिराळा मतदारसंघात चांगला संपर्क आहे.
महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी माझ्याशी चर्चा केली आहे. हातकणंगले मधून लढायचे की नाही? या बाबत अजून निर्णय झालेला नाही. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) मधील काही वरिष्ठ नेत्यांनी मला संपर्क साधला असून दोन दिवसात आपण निर्णय जाहीर करू, अशी प्रतिक्रिया राहुल महाडिक यांनी दिली आहे.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.