Chandrakant Patil On Mahadev Jankar : महायुतीच्या बैठकांना 'रासप'ला निमंत्रण का नाही? पाटील म्हणाले, "जानकर हे..."

Chandrakant Patil On Lok Sabha Election 2024 : "बैठकांच्या माध्यमातून संघटन अधिक मजबूत करून 60 टक्के मतदान महायुतीच्या उमेदवाराला पडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत," असं पाटलांनी सांगितलं.
mahadev jankar chandrakant patil
mahadev jankar chandrakant patil sarkarnama
Published on
Updated on

आगामी लोकसभा निवडणुका ( Lok Sabha Election 2024 ) जशा जवळ येत आहेत, तसं महाविकास आघाडी ( Mahavikas Aghadi ) आणि महायुतीमधील ( Mahayuti ) घटक पक्षांत सारं काही आलबेल नसल्याचं चित्र समोर येत आहे. महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला ( Vanchit Bahujan Aghadi ) सामावून घेण्याबाबत ठोस तोडगा निघताना दिसत नाही. दुसरीकडे महायुतीमध्ये रासपचे महादेव जानकर हे नाराज असल्याचं समोर आलं आहे. पुण्यात होणाऱ्या महायुतीच्या बैठकीला रासपला निमंत्रण देण्यात आलेलं नाही. यावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

mahadev jankar chandrakant patil
Eknath Shinde On Manoj Jarange : जरांगे-पाटील अजूनही नाराज का आहेत? मुख्यमंत्री उत्तर देत म्हणाले...

पुणे जिल्ह्यातील बारामती, शिरूर आणि पुणे शहर लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) यांच्यावर देण्यात आली आहे. या मतदारसंघात महायुतीत सहभागी असलेल्या कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडणूक लढेल आणि विजयी होऊ शकेल, यावर चर्चा करण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. बैठकीच्या माध्यमातून तिन्ही लोकसभा मतदारसंघांचा चंद्रकांत पाटील आढावा वरिष्ठांना देणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

चंद्रकांत पाटलांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप शेतकरी संघटना, लोक जनशक्ती पार्टी, आरपीआय, शिवसंग्राम पक्षाचे नेते, वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी चंद्रकांत पाटलांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

mahadev jankar chandrakant patil
Lok Sabha Election 2024 : अजितदादांनी आढळरावांना 'शब्द' दिला; आता घड्याळ बांधणार ?

चंद्रकांत पाटील म्हणाले, "लोकसभेचं रणशिंग फुंकण्यात आलं आहे. त्यामुळे महायुतीतील 16 घटक पक्षांच्या लोकसभानिहाय बैठका व्हाव्यात म्हणून पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचं आयोजन करण्यात आलं. बैठकांच्या माध्यमातून बूथ स्तरावर संघटन अधिक मजबूत करून 60 टक्के मतदान महायुतीच्या उमेदवाराला पडण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. असं झालं तर विरोधकांना उमेदवारी दाखल न करण्याचा सल्ला द्यावा लागेल."

mahadev jankar chandrakant patil
Supriya Sule News : हर्षवर्धन पाटलांचा लेटरबॉम्ब, सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'आमचे कौटुंबिक संबंध...'

महादेव जानकर यांच्या 'रासप'ला बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं नाही. याबद्दल विचारल्यावर चंद्रकांत पाटलांनी म्हटलं, "महादेव जानकर ( Mahadev Jankar ) हे महायुतीबरोबर कायम राहणार असून, ते कुठेही जाणार नाहीत, हे मी छातीठोकपणे सांगतो. पण, जानकरांचे मत त्यांचे परममित्र असलेले देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मोठ्या बहीण पंकजा मुंडे यांच्याकडे मांडत आहेत. त्यांच्या प्रश्नांचे समाधान करायला ते दोघेही समर्थ आहेत. मात्र, त्यांचे समाधान होत नाही, तोपर्यंत मला बैठकांना बोलवू नका, अशी त्यांनी विनंती केली आहे. त्यामुळे त्यांच्या विनंतीचा मान राखून त्यांना बोलावण्यात आलं नाही."

R

mahadev jankar chandrakant patil
Ramraje Naik Nimbalkar News : माढा लोकसभेसाठी अजितदादा गट आक्रमक, रामराजेंनी घेतली आग्रही भूमिका

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com