Mahadev Jankar News: भाजप जानकरांचे दबावतंत्र मोडून काढणार की मनधरणी करणार..?

Parbhani Loksabha Election 2024 : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव व बीड लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी जाहीर केले, पक्षाने सांगितले तर...
Pankaja Munde, Mahadev Jankar
Pankaja Munde, Mahadev JankarSarkarnama
Published on
Updated on

Parbhani News : महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी परभणी व माढा लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्याचे जाहीर केले. तसेच शरद पवार यांचीही भेट घेतली. महादेव जानकर यांच्या या पावित्र्याने महायुतीच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

निवडणुकीच्या तोंडावर दबावतंत्राचा वापर करून आगामी काळात राजकीय लाभ पदरात पाडून घेण्याचा जानकर यांचा मानस असला तरी महायुतीच्या नेतृत्वाकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

महादेव जानकर (Mahadeo Jankar) यांचे दबावतंत्र यशस्वी होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर हे प्रामुख्याने राज्यातील धनगर समाजाचे नेतृत्व करतात. ओबीसी प्रवर्ग हा भारतीय जनता पक्षाचा पारंपारिक मतदार असल्याने राज्यातील भाजप नेतृत्वाकडून जानकर यांना आमदारकी व मंत्रिपद देण्यात आले होते. महादेव जानकर भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना बहीण मानतात.

Pankaja Munde, Mahadev Jankar
Akola Politics : महाविकास मध्ये ठिणगी ; अकोला पश्चिम पोटनिवडणुकीत काँग्रेस - शिवसेना आमने सामने !

मात्र, जानकर यांच्या भूमिकेमुळे त्यांच्या राजकीय प्रवासात अडथळे निर्माण झाले. याच दरम्यान धनगर समाजातील गोपीचंद पडळकर यांचे नेतृत्व समोर आले आणि त्यानंतर जानकर व राज्यातील भाजप नेत्यांमध्ये दुरावा निर्माण झाला. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील ओबीसी मतदारांना साद घातली. राज्यातील विविध ठिकाणी संपन्न झालेल्या ओबीसी एल्गार मेळाव्यामध्ये जानकर यांनी आक्रमक भूमिका मांडली.

तसेच परभणी व माढा लोकसभा मतदारसंघातून स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. जानकर यांना राज्यातील धनगर समाजात मोठा जनाधार आहे. तसेच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ओबीसी प्रवर्गातील इतर जातींच्या एकत्रीकरणाचा प्रयत्न मेळाव्यांमधून झाला. हा मतदार भारतीय जनता पक्षाचा पारंपारिक मतदार आहे. त्यामुळे जानकर यांची उमेदवारी महायुतीच्या उमेदवाराला धोकादायक ठरू शकते. त्यातच महादेव जानकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेऊन महाविकास आघाडीचाही पर्याय खुला असल्याचा संदेश दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यामुळे महायुतीच्या नेतृत्वाकडून जानकर यांची मनधरणी होईल, असा जानकर यांचा होरा असावा. मात्र, आपल्या मागण्या मान्य करून घेण्याचे दबावतंत्र असल्याने महायुतीच्या नेतृत्वाकडून जानकर यांच्याशी कुठल्याही पातळीवर चर्चा झाली नसल्याचे कळते. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव व बीड लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना जाहीर केले, पक्षाने सांगितले तर जानकर यांची समजूत काढणार. त्यामुळे जानकर यांचे दबाव तंत्र यशस्वी होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Pankaja Munde, Mahadev Jankar
Nashik Loksabha Constituency: 'गोकुळ पिंगळे म्हणतात, 'नाशिक मतदारसंघ आमचाच...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com