Madha Lok Sabha News : मुंबई बाजार समितीबाबत ( Mumbai Bajar Samiti ) काही तक्रारी झाल्यावरून सातारा लोकसभेचे उमेदवार ( Satara Loksabha Constituency ) आमदार शशिकांत शिंदेंवर गुन्हा नोंदवून त्यांना निवडणुकीतून अडविण्याचा व थांबविण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण, त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केल्यास सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते या विरोधात आवाज उठवून संघर्ष करतील, असा इशारा खासदार शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी दिला आहे.
दहिवडी येथे माढा लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील ( Dhairyasheel Mohite Patil ) यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पवार बोलत होते. या वेळी त्यांनी मुंबई मार्केट समितीतील तक्रारीवरून शशिकांत शिंदेंना ( Shashikant Shinde ) त्रास देण्याचा प्रकार महायुतीतील भाजपकडून ( Bjp ) सुरू आहे. याबाबत भाष्य केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शरद पवार म्हणाले, "शशिकांत शिंदे आणि त्यांचे काही सहकारी मुंबई मार्केट समितीत चांगले काम करत आहेत. त्या मार्केट समितीत काही तक्रारी झाल्या आहेत. त्या मार्केट कमिटीत अतिशय उत्तम काम करणारे पानसरे नावाचे संचालक यांना अटक केली आहे."
"शशिकांत शिंदेंवरही गुन्हा नोंदवून काहीही करून त्यांना अडवत निवडणुकीतून त्यांना थांबविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्यावर खटला दाखल केला आहे. आता त्यांना अटक करण्याचा प्रयत्न झाला, तर आम्ही हा अन्याय सहन करणार नाही. सातारा जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या विरोधात आवाज उठवून संघर्ष करतील," असा इशारा खासदार शरद पवार यांनी दिला आहे.
( Edited By : Akshay Sabale )
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.