Shashikant shinde News : पाच वर्षांत शशिकांत शिंदेंच्या संपत्तीत १०.१२ कोटींनी वाढ; ८४.९८ लाखांचे कर्ज...

Vaishali Shinde शशिकांत शिंदेंकडे २५ हजार २५० रुपये, तर पत्नी वैशाली शिंंदे यांच्याकडे २० हजार रुपये, तर अविभक्त कुटुंब म्हणून २१ हजार रुपयांची रोकड आहे.
MLC Shashikant Shinde
MLC Shashikant Shindesarkarnama

Satara Loksabha News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या वतीने सातारा लोकसभेसाठी आमदार शशिकांत शिंदे यांनी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ते कोट्यधीश उमेदवार असल्याचे दिसत आहे. त्यांच्याकडे तीन कोटी नऊ लाख रुपयांची जंगम, तर दोन कोटी ६५ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. दहा कोटींची शेतजमीन असून, एक कोटी १४ लाखांच्या चार आलिशान गाड्या आहेत. २०१९ मध्ये त्यांच्याकडे एकूण ४४ कोटी २६ लाखांची संपत्ती होती. यामध्ये तब्बल दहा कोटी १२ लाखांनी वाढ होऊन ती ५४ कोटी ३८ लाखांवर गेली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांनी 2022- 23 मध्ये ५७ लाख ६७ हजार रुपयांचे करप्राप्त उत्पन्न दर्शविले आहे. पत्नी वैशाली यांनी एक कोटी ४६ हजार कर प्राप्त उत्पन्न, तर हिंदू अविभक्त कुटुंब तीन लाख सात हजार रुपयांचे करप्राप्त उत्पन्न दाखविले आहे. शशिकांत शिंदेंकडे २५ हजार २५० रुपये, तर पत्नी वैशाली शिंंदे यांच्याकडे २० हजार रुपये, तर अविभक्त कुटुंब म्हणून २१ हजार रुपयांची रोकड आहे.

तर विविध बॅंकांमध्ये शशिकांत शिंदेंची २२ लाख १७ हजारांची ठेवी व शिल्लक रक्कम आहे, तर पत्नी वैशालींच्या नावे २९ लाख ९३ हजार १३१ रुपयांच्या ठेवी व शिल्लक रक्कम आहे. विविध शेअर्स, म्युच्युअल फंड आदींमध्ये शशिकांत शिंदेंच्या नावे ८४ लाख ९८ हजारांची गुंतवणूक तर पत्नी वैशालींच्या नावे सात कोटी ४८ लाखांची गुंतवणूक आहे.

MLC Shashikant Shinde
Satara Loksabha : शशिकांत शिंदेंचा उदयनराजेंवर पलटवार; म्हणाले, निवडणुकीत रडीचा डाव खेळू नका...

शशिकांत शिंदे व त्यांच्या पत्नी वैशाली यांच्याकडे एक कोटी १४ लाखांच्या चार आलिशान गाड्या आहेत. यामध्ये फॉर्ड इंडिवेअर, टोयाटो फॉर्च्युनर, टोयाटो इनोव्हा, बीएमडब्ल्यू या गाड्यांचा समावेश आहे. शशिकांत शिंदे यांच्या पत्नीकडे ८६५ ग्रॅम सोने असून, त्याची किंमत ४० लाख ४३ हजार रुपये आहे. शशिकांत शिंदेंकडे दहा कोटींची शेतजमीन असून, पत्नीच्या नावे २६ कोटी ८५ लाखांची जमीन आहे.

शशिकांत शिंदे यांच्याकडे तीन कोटी नऊ लाखांची असून, पत्नीच्या नावे १३. २९ कोटींची जंगम मालमत्ता आहे. तर शिंदेंच्या नावे २. ६५ कोटींची तर पत्नीच्या नावे ५.६५ कोटींची स्थावर मालमत्ता आहे. शशिकांत शिंदे यांच्यावर ८४ लाख ९८ हजार रुपयांचे कर्ज असून, पत्नीच्या नावे सात कोटी ४८ लाखांचे कर्ज आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

MLC Shashikant Shinde
Shashikant Shinde News : साताऱ्यात 'माथाडी' नेते समोरासमोर, पाटलांच्या 'त्या' आरोपाला शिंदेंचं प्रत्युत्तर; म्हणाले...

शेत जमीन, निवासी, बिगरशेती व वाणित्य इमारती अशी एकूण दहा कोटी सहा लाख ६५ हजारांची तर पत्नीच्या नावे २६ कोटी ८५ लाख ७० हजार रुपयांची मालमत्ता आहे. २०१९ मध्ये त्यांची एकूण संपत्ती ४४ कोटी २६ लाख रुपये होती. गेल्या पाच वर्षांत यामध्ये तब्बल दहा कोटी १२ लाखांनी वाढ होऊन ती ५४ कोटी ३८ लाखांवर गेली आहे.

Edited By : Umesh Bambare

R

MLC Shashikant Shinde
Satara Loksabha : 'शाहू महाराजांना घरी जाऊन उमेदवारी, तुम्हाला का नाही', उदयनराजेंनीच सांगितलं कारण

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com