Prakash Ambedkar News : 'वंचित'ला मतदान करु नका म्हणणाऱ्या तुषार गांधींना आंबेडकरांनी झापलं; म्हणाले...

Loksabha Election 2024 : भाजपला सत्तेतून खेचण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्व पक्षांनी एकत्र येऊन लोकसभा निवडणूक लढविणे गरजेचे होते. मात्र, वंचितने स्वतंत्र उमेदवार देत चूक केली आहे.
Prakash Ambedkar,Tushar Gandhi
Prakash Ambedkar,Tushar GandhiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचे पणतू एकमेकांच्या विरोधात उभे राहिल्याचे दिसून येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत वंचितमुळे मतविभाजणी होण्याची शक्यता आहे. त्यात मतांचे विभाजन करण्याचे काम हे वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम काम करत आहेत. हे दोन्ही पक्ष भाजपची बी टीम आहे. त्यांच्याविरोधात अधिकाधिक प्रचार करून त्यांना मतदान न करण्याचे आवाहन महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केले. यावरुन आता राजकारण तापले असून गांधी यांच्या या टीकेवर प्रकाश आंबेडकर यांनी जशास तसा पलटवार केला आहे.

महाविकास आघाडीत सहभागी होऊन वंचितने (Vanchit Bahujan Aaghadi) निवडणूक लढवावी, असा आग्रह महाविकास आघाडीमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार,उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी धरला होता. यासाठी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी वारंवार चर्चादेखील केली जात होती. मात्र, जागावाटप योग्य पद्धतीने होत नसल्याचे कारण पुढे करत आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडणे पसंत केले.

Prakash Ambedkar,Tushar Gandhi
Beed Politics : बीडमध्ये नवा ट्विस्ट; 'ओबीसीं'च्या नेत्याचा 'टॉप गिअर'; पंकजा मुंडे, सोनवणेंना धक्का देणार?

प्रत्येक लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्याचे जाहीर करत काही ठिकाणी त्यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणादेखील केली आहे.अशातच प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेल्या निर्णयावर महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी कडक शब्दांत टीका केली आहे.याच टीकेला आता तुषार गांधी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

तुषार गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा ॲड. प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar यांनी खरपूस समाचार घेतला असून, त्यांना खरी बाजू लक्षात आणून दिली आहे.आंबेडकरांनी ही माहिती त्यांच्या एक्स हॅंडलवर पोस्ट केली आहे. त्यात आंबेडकर म्हणाले,तुम्ही अलिकडे केलेले विधान अत्यंत चुकीचे,कोणताही आधार नसलेले आणि वंचित बहुजनांच्या राजकारणात अडथळा निर्माण करणारे आहेच.पण संसदीय लोकशाही आणि स्वतंत्र राजकीय नेतृत्वासाठीच्या प्रयत्नांना,तसेच वर्ग,जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन सुरू असलेल्या सर्वसमावेशक राजकारणाला नाकारणारे आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आंबेडकर म्हणाले, महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीसोबत कसा व्यवहार केला हे तुम्हाला माहिती नाही का? त्यांचे राजकारण किती अलिप्त आहे हे तुम्हाला माहीत नाही का तुमच्या आजोबांची ब्रिटिशांविरुद्धची चळवळ सर्वसमावेशक होती, पण तुमचे विचार आणि राजकारणामध्ये तशी स्पष्टता दिसत नसल्याचा टोलाही त्यांनी तुषार गांधी यांना लगावला आहे.

तुषार गांधी यांची कानउघडणी करताना आंबेडकर म्हणाले, महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीसोबत कसा व्यवहार केला हे तुम्हाला माहिती नाही का? त्यांचे राजकारण किती अलिप्त आहे हे तुम्हाला माहीत नाही का? तसेच महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये झालेली तडजोड तुम्हाला माहिती नाही का? असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.

Prakash Ambedkar,Tushar Gandhi
Lok Sabha Election 2024 : 'या' 11 जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात; तीन ठिकाणी अद्याप 'वेट अँड वॉच'

तसेच आंबेडकर (Tushar Gandhi) यांनी जर तुमच्याकडे राजकीय ज्ञान आणि समज नसेल, तर निरर्थक गोष्टी करण्यात आणि निराधार आरोप करण्यात तुमचा वेळ घालवू नका. काळच सत्य परिस्थिती समोर आणेल. खरं तर, आताच सगळे संकेत दिसत आहेत. पण, तुम्ही डोळे झाकल्यासारखे संदर्भहीन ज्याला काहीही आधार नाही असे वक्तव्य करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करीत असल्याचेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

तुषार गांधी नेमकं काय म्हणाले होते..?

भाजपला (Bjp) सत्तेतून खेचण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्व पक्षांनी एकत्र येऊन लोकसभा निवडणूक लढविणे गरजेचे होते. मात्र, वंचितने स्वतंत्र उमेदवार देत चूक केली आहे. वंचित विकास ही भारतीय जनता पक्षाची बी टीम असल्याने महाविकास आघाडीत सहभागी न होण्याचा निर्णय वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी घेतला असल्याचा आरोप गांधी यांनी केला. वंचित भाजपला मदत करत असल्याने लोकसभेच्या निवडणुकीत वंचितला मतदान करू नका. प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या उमेदवारांना मतदान न करण्याचे जाहीर आवाहन गांधी यांनी केले.

Prakash Ambedkar,Tushar Gandhi
Beed Politics : बीडमध्ये नवा ट्विस्ट; 'ओबीसीं'च्या नेत्याचा 'टॉप गिअर'; पंकजा मुंडे, सोनवणेंना धक्का देणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com