Kolhapur Politics : सतेज पाटील-महाडिक एकाच पोस्टरवर झळकले, कार्यकर्त्यांना बसला धक्का!

Kolhapur Political News : कोल्हापूरच्या राजकारणात कट्टर राजकीय वैरत्व असणारे आणि एकेकाळचे जिवलग मित्र
Kolhapur Politics
Kolhapur Politics Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण प्रत्येक पर्वाला वेगवेगळे वळण घेत असते. उद्याचा शत्रू आणि आजचा मित्र आजचा मित्र उद्याचा शत्रू अशा विविध टप्प्यावर इथले राजकारण घडत गेले आहे. महाराष्ट्रातील राजकारणात कोल्हापूरला विशेष महत्त्व दिले जाते. येथील प्रत्येक निवडणूक टोकाच्या इर्षेसह मैत्रीपूर्णही लढवली जाते. (Latest Marathi News)

अशातच दोन कट्टर राजकीय वैरी सहकारात एकत्र येऊन निवडणूक लढवत असतील तर ते कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात नवल नाही. पण, राजकारणात कधी काय होईल? हे सांगता येत नाही. कोल्हापूरच्या राजकारणात कट्टर राजकीय वैरत्व असणारे आणि एकेकाळचे जिवलग मित्र असणारे सहकारात एकत्र आले आहेत. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक आणि आमदार सतेज पाटील हे सहकारात एकत्र आलेत. शेतकरी संघाच्या निवडणूक निमित्ताने त्यांचे प्रचारपत्रक कोल्हापूर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे. (Latest Marathi News)

Kolhapur Politics
Nashik BJP Vs NCP : नाशिकच्या देवळाली मतदारसंघावरून अजित पवार गट Vs भाजपमध्ये संघर्ष

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शेतकरी संघाला बळकटी मिळावी. संघ चांगल्या नेतृत्वाकडे जावा, यासाठी मंत्री पाटील, आमदार पाटील, खासदार महाडिक, आमदार पी. एन. पाटील व आमदार कोरे यांच्यासोबत राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी पॅनेलची बांधणी केली. यामध्ये प्रत्येक आमदार व खासदार यांना ठराविक जागांचे वाटप केले. यामुळे संघाची निवडणूक बिनविरोध होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, शेवटपर्यंत याला यश आले नाही.

Kolhapur Politics
Kolhapur Political : खासदार संजय मंडलिकांचा पत्ता कट ? तर कोल्हापूर भाजपकडे...

आता याच नेत्यांचे विषेशत: आमदार पाटील आणि खासदार महाडिक यांचे फोटो एकाच प्रसिद्धी पत्रकावर पाहून लोकांना धक्का बसला आहे.या निमित्ताने शेतकरी सहकारी संघाची निवडणूक सर्वांपर्यत पोहोचली आहे.

कोणाची झाली आघाडी?

पालकमंत्री हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी), उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (भाजप), खासदार धनंजय महाडिक (भाजप), आमदार सतेज पाटील (काँग्रेस), आमदार पी. एन. पाटील (काँग्रेस) व आमदार विनय कोरे (जनसुराज्य शक्ती) यांचे फोटो शेतकरी सहकारी संघाच्या निवडणूक प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या पत्रकावर प्रसिध्द केले आहेत. याच प्रसिध्दीपत्रकावर जिल्ह्यात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले खासदार धनंजय महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांचेही हसरे फोटो पाहून जिल्ह्यात चर्चेचा विषय झाला आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com