Sunil Tatkare : अजितदादांसाठी गुड न्यूज! रायगडचा सुभेदार सुनील तटकरे आघाडीवर

NCP Leader Sunil Tatkare Leading in Raigad Constituency 2024 : शिवसेनेच्या बालेकिल्याला 2019 मध्ये तटकरेंनी खिंडार पाडले. यंदा शिवसेनेतील फूटीमुळे ठाकरेंना सहानूभुती असल्याने गितेंना फायदा होईल असा अंदाज होता.
Sunil Tatkare Anant Geete
Sunil Tatkare Anant Geetesarkarnama

Raigad Lok Sabha Election Result 2024 : अजित पवार पवार यांच्यासाठी रायगडमधून गुड न्यूज येत आहे. पहिल्या सात फेऱ्यांमध्ये सुनील तटकरे हे 22 हजारांचे लीड घेतले आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे अनंत गिते डेंजर झोनमध्ये आले आहेत.

शिवसेनेच्या बालेकिल्याला 2019 मध्ये तटकरेंनी खिंडार पाडले. यंदा शिवसेनेतील फूटीमुळे ठाकरेंना सहानूभुती असल्याने गितेंना फायदा होईल असा अंदाज होता. मात्र, सात फेऱ्यांमध्ये तटकरेंनी 22 हजाराचे लीड घेतली होते.

पाचव्या फेरीत तटकरेंना पाच हजारांचे लीड होते. हे सातव्या फेरीपर्यंत 22 हजारांपर्यंत वाढले. त्यामुळे गितेंचे टेन्सन वाढले. 2019 च्या निवडणुकीत तटकरे यांना 4 लाख 86 हजार 968, तर गीते यांना 4 लाख 55 हजार 530 मते मिळाली होती. तटकरे यांनी त्या निवडणुकीत Election विजय मिळवला होता.

2014 लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे हे दोन हजार मतांनी पराभूत झाले होते. मोदी लाटेत देखील त्यांनी अवघ्या दोन हजार मतांनी पराभूत झाले होते. मात्र 2019 मध्ये ते विजयी झाले. यंदा एक्झिट पोलमध्ये ते पराभूत होत असल्याचा अंदाज होता. मात्र हा अंदाज चुकणार की काय असे पहिल्या सात फेऱ्यांचे चित्र होते.

Sunil Tatkare Anant Geete
Sunil Tatkare Anant Gite : हार के जीतने वाले को बाजीगर कहते है! रायगडचा 'बाजीगर' कोण?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com