Kolhapur Constituency : संजय मंडलिकांचा 'गेम' कुणामुळे? कोल्हापुरात मुश्रीफ-घाटगे गटात 'ब्लेमिंग वॉर'

Kolhapur Lok Sabha 2024 Hasan Mushrif Vs Samarjit Ghatge : कोल्हापूर लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांनी दीड लाखावर मताधिक्य मिळवत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिक यांचा दारुण पराभव केला.
Sanjay Mandlik, Hasan Mushrif Vs Samarjit Ghatge
Sanjay Mandlik, Hasan Mushrif Vs Samarjit GhatgeSarkarnama

Sanjay Mandlik Kolhapur Lok Sabha : कोल्हापूर लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांनी दीड लाखावर मताधिक्य मिळवत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिक यांचा दारुण पराभव केला. मात्र आता मंडलिकांचा पराभव कोणामुळे झाला यावरुन महायुतीत वाद रंगला आहे.

कोल्हापुरात हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे गटाच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर मंडलिक यांचं काम प्रामाणिकपणे न केल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे आता मंडलिकाच्या पराभवामुळे युतीमध्ये नव्या वादाची ठिणगी पडल्याचं दिसत आहे.

महायुतीतील अनेक नेत्यांनी आपापसातील स्थानिक पातळीवरील वाद विसरुन मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी लोकसभेचा प्रचार केला. मात्र आता निकालानंतर महायुतीला अपेक्षिक यश मिळालं नसल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे युतीतील घटकपक्षांनी प्रामाणिकपणे काम केलं नसल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यावरुन एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपदेखील केले जात आहेत.

अशातच आता कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Lok Sabha) मदतारसंघाचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या पराभवाचे खापर हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे गट एकमेकांवर फोडत असल्याचं दिसत आहे. याबाबतचे मेसेज सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये दोन्ही गटांनी एकमेकांवर मंडलिक यांचं काम प्रामाणिकपणे न केल्याचा आरोप केला जात आहे.

Sanjay Mandlik, Hasan Mushrif Vs Samarjit Ghatge
NCP Ajit Pawar : जयंत पाटील लवकरच शरद पवारांची साथ सोडणार, अजितदादांच्या 'या' मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

कामाचा पुरावा देण्याची गरज नाही

तर या सर्व आरोपांना उत्तर देताना मुश्रीफ म्हणाले, "कागलमधील संजय मंडलिक गटाला माहिती आहे कोणी प्रामाणिकपणे काम केलं आणि कोणी केलं नाही. आम्हाला आमच्या कामाचा पुरावा देण्याची गरज नाही"

ब्लेम-गेमच्या बालीशपणात रस नाही

समरजित घाटगे यांनी पराभवाबाबत सर्वांनीच आत्मचिंतन करायला पाहिजे असं म्हटलं आहे. घाटगे म्हणाले, "कोल्हापुरात सर्वांनीच आत्मचितंन केलं पाहिजे. आरोप-प्रत्यारोपाच्या ब्लेम-गेमच्या बालीशपणात मला रस नाही. शिवाय जे झालं ते झालं परंतु पुढील काळात विधानसभेची आता तयारी केली पाहिजे." त्यामुळे आता लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेत कोल्हापुरात युतीतील नेत्यांमध्ये आणखी जास्त खटके उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com