Dhairyashil Mane : ...म्हणून 'त्या' क्यू आर कोडवर धैर्यशील मानेंकडून तत्काळ आला खुलासा!

Hatkanangle Lok Sabha Constituency : आठ हजार दोनशे कोटी रुपयांची कामे नेमकी कुठेकुठे केली याची यादीच प्रसिद्ध केली.
Dhairyashil Mane
Dhairyashil ManeSarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election 2024 : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील 8,200 कोटी रुपयांचा निधी आणल्यानंतर खासदार धैर्यशील माने यांनी मतदारसंघात विविध ठिकाणी फलक लावलेत. फलकावर क्यूआर कोड चुकीचे असल्याचे निदर्शनास आल्यानंतर खासदार धैर्यशील माने यांनी खुलासा करत त्याचे कारण स्पष्ट केले आहे.

तांत्रिक कारणामुळे चुकीची प्रिंटिंग झाल्याने हा प्रकार घडला आहे. दरम्यान आठ हजार दोनशे कोटी रुपयांची कामे नेमकी कुठे कुठे केली याची यादीच धैर्यशील माने यांनी प्रसिद्ध केली आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील खासदार धैर्यशील माने(Dhairyashil Mane) यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमधून हातकणंगले मतदार संघासाठी एकूण 8,200 कोटी इतका निधी मंजूर करून आणला. मंजूर करून आणलेला निधी व केलेली विकास कामे याची माहिती असलेले डिजिटल बोर्ड संपूर्ण मतदारसंघातील गावोगावी लावण्यात आले होते. त्या सोबतच डिजिटल बोर्डवर एक क्यू आर कोड देण्यात आला.

ज्या क्यूआर कोडच्या माध्यमातून हातकणंगले लोकसभा मतदारसंघातली प्रत्येक गावासाठी मंजूर केलेला निधी व निधीतून पूर्ण होणारी कामे याची सविस्तर माहिती समाविष्ट करण्यात आली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dhairyashil Mane
Sangli Politics : चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित; सांगलीवरून आघाडीत वादाची ठिणगी!

काही तांत्रिक कारणांमुळे क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर मंजूर केलेला निधी व विविध विकास कामे यांची यादी न दिसता, वेगळीच वेबसाईट ओपन होत होती. याबाबत खुलासा देताना धैर्यशील माने म्हणाले, 'हा केवळ क्यू आर कोडचा प्रिंटिंग एरर आहे. सध्याच्या डिजिटल युगात केलेल्या विकासकामांची माहिती नागरिकांपर्यंत सुलभतेने पोहचावी यासाठी आम्ही या माध्यमातून प्रयत्नशील होतो पण एरर असल्याने काही बोर्डवर लिंक ओपन होऊन शकली नाही.  त्यामुळे आम्ही नवीन कोड प्रसारित करत आहोत.'

तसेच 'विकास कामांची संपूर्ण माहिती असलेली लिंक आणि क्यूआर कोड या सोबत जोडला आहे. तरी त्याद्वारे शहानिशा करून घ्यावी.' अशी माहिती खासदार धैर्यशील माने यांचे जनसंपर्क अधिकारी रणजीत जाधव यांनी दिली. 

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Dhairyashil Mane
Sanjay Raut On Shahu Chhatrapati : "छत्रपतींनी हाती मशाल धरली तर....", संजय राऊतांचं मोठं विधान

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com