Kolhapur Constituency : 'भावी' नगरसेवक प्रचारात राबला, लीड दिलं; आता उमेदवारीचे वेध...

Loksabha Election : आगामी येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या निवडणुकीमुळे नेत्यांची मर्जी वाढवण्यासाठी 24 तास कार्यकर्त्ये धडपडताना दिसतं होते. तेही मतदानाच्या दुसर्‍या दिवसापर्यंत.
Loksabha Election
Loksabha ElectionSarkarnama

Kolhapur Loksabha ELection : कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात यंदा मतदानाचा टक्का वाढला आहे. कोल्हापूर तिसऱ्या टप्प्यापर्यंत राज्यात आघाडीवर आहे. कोल्हापूर मतदारसंघातील मतदानाची टक्के वारी पाहता उमेदवारांचे आणि संबंधित यंत्रणेचे सूक्ष्म नियोजन फायदेशीर ठरत आहे. त्यात शहरात आणि महापालिकेच्या क्षेत्रात दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच ईर्षा लागून राहिली होती. त्यात आगामी येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या निवडणुकीमुळे (Loksabha Election News) नेत्यांची मर्जी वाढवण्यासाठी 24 तास कार्यकर्त्ये धडपडताना दिसतं होते. तेही मतदानाच्या दुसर्‍या दिवसापर्यंत.

कोल्हापूर शहरातील दोन्ही उमेदवारांनी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी विशेष वाहनाची सोय केली होती. महाविकास आघाडीकडून फुलपाखरू तर महायुतीकडून जास्वाद या फुलांची स्टिकर रिक्षावार लावण्यात आली होती. त्याची संपूर्ण यंत्रणा माजी नगरसेवक यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली होती. आपापल्या बूथवरील मतदानावरून त्यांची महापालिका निवडणुकीतील भविष्यातील गणिते धरूनच माजी नगरसेवक आणि इच्छुक दिवसभर सक्रिय दिसत होते. शिवाय लावलेली फिल्‍डिंग यशस्वी करण्यासाठी माजी नगरसेवक स्वतः बूथवर दिवसभर थांबून होते.

Loksabha Election
Priyanka Chaturvedi : प्रियांका चतुर्वेदींनी मारला पंजा पण घायाळ केले; शीतल म्हात्रे, ज्योती वाघमारेंनी

सध्या कोल्हापूर महापालिकेवर गेल्या चार वर्षांपासून प्रशासक राज आहे. चार वर्ष महानगरपालिकेसाठी निवडणूक झाली नाही. अशातच यंदा लागेल पुढच्या वर्षी लागेल असे गृहीत धरून अनेक इच्छुकांनी आपले कामं सुरु ठेवले आहे. मात्र निवडणूक लागत नसल्याने आणि पैसा खर्च होत असल्याने अनेकांनी कामं थांबवले होते. मात्र पुढील काही महिन्यात महापालिका निवडणूक लागण्याची शक्यता आहे.

त्यामुळे माजी नगरसेवकांना मतदारांसमोर जाण्याची हिच संधी शोधून इच्छुकांनी आपली तयारी सुरु केली आहे. निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमुळे दोन-तीन राजकीय पक्ष एकत्रित आले आहेत. यानिमित्ताने भागात आपले वर्चस्व ठेवण्यासाठी आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याची संधी माजी नगरसेवकांनी साधली आहे. मात्र जो इच्छुक जास्त लीड देईल त्यालाच प्रसाद मिळणार हे नक्की आहे. loksabha Election campaign strategies

Loksabha Election
Lok Sabha Election 2024: शरद पवार काँग्रेसमध्ये जातील अन् ठाकरे गटात फक्त..., नेमकं काय म्हणाले शिरसाट?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com