Phaltan : वय कमी करून भरतीचे अमिष; फलटण, माणमधील दोघांवर गुन्हा

वारंवार सुनील पवार Sunil Pawar यांनी पैसे परत मागूनही त्यांनी न दिल्याने फसवणूक Fraud केल्याचे पवारच्या लक्षात आले. त्यांनी फसवणूक झाल्याची फिर्याद दाखल केली. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक Sub-Inspector of Police सागर अरगडे हे करीत आहेत.
Crime
Crime sarkarnama
Published on
Updated on

फलटण शहर : वय कमी करून पोलिस किंवा आर्मीमध्ये भरती करतो, अशी बतावणी करत तीन लाख रुपये घेऊन एका तरुणाची फसवणूक केल्याप्रकरणी वडले (ता. फलटण) येथील कोडवलकर ॲकॅडमीच्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रवींद्र नामदेव कोडवलकर (रा. दालवडी, ता. फलटण), व अवचित दादासो ताटे (रा.वारुगड, ता. माण) अशी गुन्हा नोंद झालेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, कोडवलकर करिअर ॲकॅडमी येथे १० मे २०२२ रोजी प्रवेश घेताना सुनील त्र्यंबक पवार (वय २५, रा. फडतरवाडी विखळे (ता. कोरेगाव) यास प्रवेशाप्रसंगी वय जास्त असल्याने त्यास तुला ॲकॅडमीत प्रवेश घ्यायचा असेल तर, तुझे वय कमी करावे लागेल, असे सांगितले.

Crime
फलटण पोलिसांची धडाकेबाजी कारवाई : मोटार सायकल चोरणारी टोळी जेरबंद

वय कमी करून लावण्यासाठी आम्हाला तीन लाख रुपये द्यावे लागतील. तुझे वय कमी करून पोलिस भरती किंवा आर्मीमध्ये भरती करू, असे आमिष दाखवून ॲकॅडमीचे रवींद्र नामदेव कोडवलकर (रा. दालवडी, ता. फलटण) व अवचित दादासो ताटे (रा. वारुगड, ता. माण) यांनी सुनील त्र्यंबक पवार कडून ता. १२ मे रोजी ४० हजार रुपये ऑनलाईन व १७ मे रोजी शिंगणापूर रोड, फलटण येथे २ लाख ६० हजार रुपये रोख घेतले.

Crime
Satara : भाजपचे मिशन 'सातारा जिल्हा परिषद'; तालुकानिहाय बैठका, सभांचे आयोजन...

नंतर वारंवार सुनील पवार याने पैसे परत मागूनही त्यांनी न दिल्याने फसवणूक केल्याचे पवारच्या लक्षात आले. याबाबत फसवणूक केल्याची फिर्याद सुनील त्र्यंबक पवार यांनी केली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सागर अरगडे हे करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com