-रुपेश कदम
Madha Lokasabha News : लक्षवेधी अशा माढा लोकसभा मतदारसंघाचा मानकरी कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले असले तरी माण विधानसभा मतदारसंघच माढ्याचा मानकरी ठरवणार, यात कोणाचेच दुमत असणार नाही. २०१९ च्या निवडणुकीत अचानक आणि अनपेक्षितपणे मोठा उलटफेर होऊन राष्ट्रवादीच्या संजय शिंदे आणि भाजपच्या रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यात थेट लढत झाली. मात्र, माळशिरस मतदारसंघाने दिलेल्या भरभक्कम आघाडीच्या बळावर रणजितसिंह नाईक-निंबाळकर दिल्लीत पोहाेचले.
मागील पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. अनेकांनी तत््तत्त्व, निष्ठा व पक्षाला तिलांजली दिली. कट्टर विरोधक एकत्र आले तर खास मित्र कडवे विरोधक बनले. संपूर्ण माढ्यात भाजप फोफावला तर राष्ट्रवादी व शिवसेनेची शकले उडाली. शेकाप जैसे थे राहिली तर काँग्रेस कुठे आहे हे शोधावे लागत आहे. सध्या माढ्यातून महायुतीतून भाजपकडून रणजितसिंह नाईक-निंबाळकर, धैर्यशील मोहिते पाटील इच्छुक आहेत.
तर संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्यासाठी अजित पवार गटाने जोर लावला आहे. या सुंदोपसुंदीत धैर्यशील मोहिते पाटील यांचे नाव मागे पडल्याचे दिसत आहे, तर रणजितसिंह व संजीवराजे यांच्यापैकी कोणाला तिकीट मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहाेचली आहे. माणचे आमदार जयकुमार गोरे हे रणजितसिंह यांच्यासाठी आग्रही आहेत, तर मोहिते पाटील गटाचा रणजितसिंह यांना कडवा विरोध आहे.
महाविकास आघाडीकडून माणचे अभयसिंह जगताप यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र, रासप महाविकास आघाडीसोबत आल्यास महादेव जानकर यांना मतदार सुटू शकतो. त्यादृष्टीने जोरदार हालचाली सुरू आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. महाविकास आघाडीकडून लढण्यासाठी अजून नावे पुढे येत असली तरी महादेव जानकर व अभयसिंह जगताप यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
हे सर्व पाहता माढा मतदारसंघात माणची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत आहे. महाविकास आघाडीचा उमेदवारच माणमधील असणार आहे, तर महायुतीच्या उमेदवार निश्चितीत जयकुमार गोरे यांचे मत महत्त्वाचे ठरणार आहे. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याबद्दल असलेली नाराजी व महायुतीअंतर्गत असलेला विरोध पाहता माढा लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून ऐनवेळी तिसरे नाव पुढे येण्याची शक्यता आहे. त्याचीही पक्षातर्फे चाचपणी सुरू आहे.
Edited By : Umesh Bambare
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.