Madha Loksabha : बावनकुळेंच्या संकेतानंतरही मोहिते पाटील ‘प्रचंड आशावादी’; धैर्यशील म्हणतात, भाजपचे तिकीट 100 टक्के मिळणार

Dhairyasheel Mohite Patil : माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यावर मोहिते पाटील हे आक्रमक आहेत.
 Dhairyasheel Mohite Patil
Dhairyasheel Mohite Patil Sarkarnama

Pandharpur News : माढा लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवार मिळेल, असे संकेत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतेच दिले आहेत. बावनकुळे यांच्या संकेतानंतरही भाजपचे सोलापूर जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते पाटील यांनी ‘माढ्यातून भाजपची उमेदवारी आपल्याला शंभर टक्के मिळेल,’ असा दावा केला आहे. त्यामुळे माढ्याचा उमेदवारीचा तिढा भाजपसाठी डोकेदुखी ठरणार हे आता स्पष्ट आहे. (I will get 100 percent BJP candidature from Madha : Dhairyasheel Mohite Patil )

अकलूजचे मोहिते पाटील आणि माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामध्ये काही वर्षांपासून मतभेद आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यामध्ये राजकीय दरी निर्माण झाली आहे. मोहिते पाटील यांचा संभाव्य विरोध लक्षात घेऊन निंबाळकर यांनी शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या नात्याने माढ्याच्या शिंदेंशी सलगी केली आहे. त्यांचे आमदार बबनराव शिंदे आणि करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांच्याशी सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे मोहिते पाटील हे निंबाळकर यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत.

 Dhairyasheel Mohite Patil
Praniti Shinde : सोलापूर लोकसभेसाठी चर्चेतील चेहरा...

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकेतानंतर भाजपच्या उमेदवारीबाबत धैर्यशील मोहिते पाटील यांना विचारले असता, ‘भाजप आपणास या वेळी शंभर टक्के माढ्यातून लोकसभेसाठी उमेदवारी देईल,’ असा विश्वास व्यक्त केला आहे.‌

माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यावर मोहिते पाटील हे आक्रमक आहेत. लोकसभेच्या निवडणुकीसाठी त्यांनी तयारी सुरू केली आहे. मतदारसंघातील विविध भागात धैर्यशील मोहिते पाटील यांचे ‘भावी खासदार’ असे बॅनर झळकू लागले आहेत. त्यामुळे भाजपमध्ये मोहिते आणि खासदार निंबाळकर यांच्यात उमेदवारीसाठी कोणाची निवड करायची, असा प्रश्न भाजपसमोर असणार आहे.

लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीत माढ्यातून रणजितसिंह नाईक निंबाळकर निवडून येण्यामध्ये मोहिते पाटील यांची भूमिका मोठी राहिली आहे. एकट्या माळशिरस विधानसभा मतदारसंघातून मोहिते पाटील यांनी निंबाळकर यांना एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य मिळवून दिले होते. त्यामुळे निंबाळकर यांच्या विजयासाठी ते मोलाचे ठरले होते.

 Dhairyasheel Mohite Patil
Solapur Politic's : प्रणिती शिंदेंना सोलापुरात धक्का; कट्टर समर्थकाने सोडली साथ

लोकसभेच्या तिकिटासाठी मोहिते पाटील यांचा विरोध होणार, हे लक्षात घेऊन खासदार निंबाळकर यांनी गेल्या वर्षभरापासून राजकीय जुळणी केलेली आहे. माढ्याच्या शिंदेंच्या सलगी वाढविताना मोहिते पाटील यांना शह देण्याचा एकही प्रयत्न निंबाळकर यांनी सोडलेला नाही. गेल्या महिनाभरात माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील यांना वगळून कार्यकर्त्यांचे दोन मेळावे घेतले आहेत. त्यातही त्यांनी मोहिते पाटील यांना सूचक इशारा दिलेला आहे.

दुसरीकडे, मोहिते पाटील यांनीही आपल्या वैशिष्ट्याप्रमाणे मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे. त्यांचा भर हा मतदारसंघातील जुन्या आणि निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर आहे. त्यांच्या गोठीभेटी घेऊन त्यांना चार्ज करण्याचे काम मोहिते पाटील करत आहेत. त्यातून निंबाळकर यांना शह देण्यासाठी मोहिते पाटील यांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

 Dhairyasheel Mohite Patil
BJP Politics : डरकाळीच नव्हे, हल्लाही करतो; हे दाखवून देण्याची 'सिंहा'ला संधी; माढा लोकसभेसाठी भाजपचं ठरलं...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com