Madha : काँग्रेसच्या मीनल साठेंना नेमकी कोणत्या पक्षाची उमेदवारी हवीय? काँग्रेस-राष्ट्रवादीनंतर जरांगेंकडेही मागितली उमेदवारी

Sakal Maratha Samaj Interview : माढ्याच्या नगराध्यक्षा मीनल साठे यांनी यंदा कोणत्याही परिस्थितीत विधानसभेची निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे, त्यातूनच त्यांनी यापूर्वी दोनदा ज्येष्ठ नेते शरद पवार यांची उमेदवारीसाठी भेट घेतली आहे. माढा मतदारसंघ हा महाविकास आघाडीमध्ये कोणाकडे जाणार, हे अजून निश्चित नाही.
Meenal Sathe
Meenal SatheSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 19 October : काँग्रेसच्या माढ्याच्या नगराध्यक्षा मीनल साठे यांनी सकल मराठा समाजाकडून उमेदवारी मिळावी, यासाठी समाजाच्या मुलाखतींना सोलापुरात हजेरी लावली आहे. तत्पूर्वी मीनल साठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसकडेही उमेदवारीसाठी मुलाखत दिली आहे, त्यामुळे मीनल साठे नेमक्या कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार, असा सवाल आजच्या मुलाखतीच्या निमित्ताने उपस्थित होत आहे.

माढ्याच्या नगराध्यक्षा मीनल साठे (Meenal Sathe) यांनी यंदा कोणत्याही परिस्थितीत विधानसभेची निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे, त्यातूनच त्यांनी यापूर्वी दोनदा ज्येष्ठ नेते शरद पवार यांची उमेदवारीसाठी भेट घेतली आहे. माढा मतदारसंघ हा महाविकास आघाडीमध्ये कोणाकडे जाणार, हे अजून निश्चित नाही. मात्र, मीनल साठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुलाखतीला पुण्यात जाऊन हजेरी लावली होती.

मीनल साठे यांचे सासरे काँग्रेसचे माजी आमदार धनाजीराव साठे यांनीही सुनेच्या उमेदवारीसाठी शरद पवार यांची सहकुटुंब भेट घेतली आहे. राष्ट्रवादीकडे उमेदवारीसाठी मुलाखत दिल्यानंतर काँग्रेसच्या इच्छुकांच्या मुलाखतीसाठीही मीनल साठे यांनी हजेरी लावली होती.

माढा मतदारसंघ (Madha Constituency) काँग्रेस पक्षाकडे घ्यावा आणि काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी, असा त्यांचा आग्रह आहे. माढा मतदारसंघ कोणालाही सुटला तरी आपले दावेदारी राहावी, यासाठी मीनल साठे यांनी दोन्ही काँग्रेसकडे उमेदवारीसाठी मुलाखत दिली आहे.

Meenal Sathe
Karmala Politics : भाजप वाढविणार संजय शिंदेंचे टेन्शन; करमाळ्यात तिरंगी लढतीत दिग्विजय बागल देणार शिंदे-पाटलांना चॅलेंज!

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार सोलापुरात आज विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांसाठी मुलाखती घेण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मुलाखतींच्या कार्यक्रमाला काँग्रेसच्या माढ्याच्या नगराध्यक्षा मीनल साठे यांच्याबरोबच इतर दिग्गजांनीही हजेरी लावली आहे.

सकल मराठा समाजाची उमेदवारी मिळाली, तर मीनल साठे यांनी माढ्यातून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे, त्यामुळे मीनल साठे नेमक्या कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

Meenal Sathe
Solapur Politic's : सोलापुरातील दोन शरदनिष्ठांचा अजितदादांवर हल्लाबोल; एकाने पक्ष सोडला, दुसऱ्याची पवारांकडे उमेदवारीची मागणी

जरांगे पाटील यांचा निर्णय मान्य असेल : मीनल साठे

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत झालेल्या आंदोलनात आम्ही माढा शहर आणि तालुक्यात सक्रीय सहभाग घेतला आहे. आरक्षणाच्या मुद्यावर आम्ही मराठा समाजाबरोबरच आहे, त्याचा मनोज जरांगे पाटील नक्की विचार करतील. एक महिला उमेदवार म्हणून मी सकल मराठा समाजाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. उमेदवारीसंदर्भात मनोज जरांगे पाटील जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, अशी प्रतिक्रिया माढ्याच्या नगराध्यक्षा मीनल साठे यांनी मुलाखतीनंतर दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com