Madha Loksabha News: धैर्यशील मोहिते पाटलांनी फडणवीसांचा दबाव झुगारला; '...तर तुरुंगामध्ये जाऊन बसण्याची तयारी!'

Dhairyashil Mohite Patil Reply to Devendra Fadnavis : 'इलेक्शन झाल्यानंतर मला अनेक गोष्टींना तोंड द्यायची वेळ येणार आहे आणि माझी काहीही तयारी आहे...'
Dhairyashil Mohite Patil - Devendra Fadnavis
Dhairyashil Mohite Patil - Devendra FadnavisSarkarnama

Madha News : माढा लोकसभा मतदारसंघात भाजपच्या रणजितसिंह निंबाळकरांविरोधात धैर्यशील मोहिते पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळवत दंड थोपटले आहे.त्यामुळे आता माढ्याची निवडणूक भाजपसह मोहिते पाटलांनी देखील प्रतिष्ठेची केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तर अकलूजच्या सभेत मोहिते पाटलांवर सडकून टीका केली होती. तसेच माढ्याला मोहिते पाटलांच्या दहशतीतून मुक्त करणार असल्याचं म्हटलं होतं. त्याच टीकेला आता धैर्यशील मोहिते पाटलांनी जशास तसं प्रत्युत्तर दिले आहे.

शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyashil Mohite Patil) यांची करमाळा तालुक्यातील केम येथे सभा झाली. त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या टीकेवर भाष्य केलं. मोहिते पाटील म्हणाले, मी शंकरराव मोहिते पाटलांचा नातू आहे, त्यामुळे असल्या कोणत्याही दबावाला भीक घालणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

तसेच मी कुटुंबात माझे आई-वडील आणि पत्नीसह दोन मुलींना सांगितलं होते की,इलेक्शन झाल्यानंतर मला अनेक गोष्टींना तोंड द्यायची वेळ येणार आहे आणि माझी काहीही तयारी आहे. मोहिते पाटील कुटुंबावर प्रेम करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेसह शेतकर्यांसाठी काय पण किंमत मोजेल,आत बसण्याची तयारी देखील ठेवली असल्याचे त्यांनी सांगितले.

Dhairyashil Mohite Patil - Devendra Fadnavis
Sharad Pawar News : "त्यांची लायकी नाही, मी यादी बाहेर काढली, तर...", शरद पवारांचा मुंडेंना कडक इशारा

धैर्यशील मोहिते पाटलांनी या सभेत फडणवीसांच्या दबावाला झुगारतानाच आता माघार नाही, तर आरपारची लढाई अशी खूणगाठ मनाशी पक्की बांधल्याचे दिसून आले आहे.ते म्हणाले, मानसिकता केल्यानंतर निवडणुकीला उतरलो आहे. मनाची तयारी झाल्यावरच शरद पवारांना (Sharad Pawar) भेटून तुमच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढणार असल्याचे सांगितले.

पण आज तुम्ही घरमालकाला सुद्धा बाहेर काढून घर बळकावण्याचे काम करत आहेत.उतारा त्यांच्या नावावर, घर त्यांच्या नावावर आणि तुम्ही ते घर त्यांचे नाही म्हणून सांगता असं म्हणत राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष बळकावल्यावरुन भाजपावर निशाणा साधला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

फडणवीस नेमकं काय म्हणाले होते..?

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अकलूजच्या विजय चौकात झालेल्या सभेत मोहिते पाटलांवर टीकेची झोड उठवली होती.रणजितसिंह निंबाळकर यांच्याविरोधात उभे राहिलेल्या उमेदवारांचं प्रतिज्ञापत्र पाहा.माळशिरस तालुक्याला त्यांच्या (मोहिते-पाटील ) दहशतीतून मुक्त करणार आहे.त्यांनी सामान्य माणसाला त्रास दिला,जमिनी बळकावल्या,लोकांचे खून केले आणि हल्लेही केले.हे सहन केलं जाणार नाही.ही लोकशाही आहे,ठोकशाही नाही.इथे ठोकशाही चालू दिली जाणार नसल्याचं देखील ठणकावलं होतं.

मोहिते-पाटलांच्या पुष्पगुच्छाचा स्वीकार नाहीच...!

धैर्यशील मोहिते-पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे.पण,विधानपरिषद आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपमध्येच आहेत.त्यातच मोहिते-पाटलांच्या अकलूज या बालेकिल्ल्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. या सभेपूर्वी रणजितसिंह मोहिते-पाटील पुष्पगुच्छ घेऊन फडणवीस यांच्या स्वागतासाठी आले होते. मात्र,फडणवीस यांनी रणजितसिंह मोहिते-पाटलांच्या पुष्पगुच्छाचा स्वीकार केला नाही.ते तिथे न थांबता थेट सभास्थळ गाठले. राजकीय वर्तुळात या प्रसंगाची जोरदारपणे चर्चा रंगली होती.

(Edited By Deepak Kulkarni)

Dhairyashil Mohite Patil - Devendra Fadnavis
Eknath Shinde News : 'ठाकरेंची विकेट गेलीय, क्लिन बोल्ड', मुख्यमंत्री शिंदेंनी ठणकावले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com