Solapur News : गावकऱ्यांनी झाप झाप झापलं! माढ्यात निधीवरून रंगला श्रेयवाद...

Primary Health Center : सात लाख रुपयांच्या निधीच्या श्रेयवादावरून खडेबोल सुनावले.
Madha News
Madha News Sarkarnam
Published on
Updated on

Madha : आरोग्य केंद्रांच्या निधीवरून माढा तालुक्यातील मानेगाव येथे श्रेयवाद रंगला आहे. समाज माध्यमांवर याबाबत आरोप-प्रत्यारोप होत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या प्रमोदिनी लांडगे यांनी आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीची तक्रार जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकारी मनीषा आव्हाळे यांना पत्रातून केली होती.

आरोग्य केंद्राच्या स्लॅपमधून गळती होत आहे. ऑपरेशन थेटर, पाणीपुरवठ्याच्या नळदुरुस्ती, संरक्षण भिंत अशा विविध मागण्या लांडगे यांनी केल्या होत्या. सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी या पत्राचा संदर्भ घेत 30 नोव्हेंबर 2023 रोजी मानेगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र व्यवहार करीत सोलापूर जिल्हा नियोजन मंडळातून सात लाख रुपये दुरुस्तीसाठी निधी मंजूर करत असल्याचे पत्र दिले. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या प्रमोदिनी लांडगे यांनादेखील त्याचे एक पत्र जिल्हा परिषदेकडून मिळाले. त्या पत्राचा आधार घेत प्रमोदिनी लांडगे यांनी काही वर्तमानपत्रांतून बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या.

मानेगाव केंद्राला सात लाख रुपयांचा निधी मिळाल्याची चर्चा पंचक्रोशीत होताच जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष व मानेगाव जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य रणजित शिंदे यांचे समर्थक मानेगावचे सरपंच तानाजी लांडगे यांनी हा निधी रणजितसिंह शिंदे यांच्या मागणीमुळे मिळाला असल्याच्या काही बातम्या प्रसिद्ध केल्या.

सोशल मीडियावर सरपंच तानाजी लांडगे यांच्या बातम्या पाहून गावकऱ्यांनी सरपंचांना प्रत्युत्तर दिले. जर रणजितसिंह शिंदे यांच्यामुळे हा निधी मिळाला असेल तर त्यांनी मागणी केलेली पत्रे सोशल मीडियावरची सरपंचांनी टाकावी, अशी मागणी सोशल मीडियातून होऊ लागली.

गावच्या विकासासाठी तुम्ही काय केलं ? गावातील पारदर्शक कामे काय केले? हे दाखवावे, असे सवालदेखील सरपंचांना सोशल मीडियातून गावकऱ्यांनी विचारले. सात लाख रुपयांच्या निधीच्या श्रेयवादावरून खडेबोल सुनावले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Madha News
Kolhapur Politics : थेट पाइपलाइनचा वाद पुन्हा पेटला; भाजपनं काँग्रेस पदाधिकाऱ्यांना केलं टार्गेट...

शिंदे समर्थकांना विचारलेल्या प्रश्नांचे अनेक स्क्रीन शॉटदेखील या वेळी सोशल मीडियावरून व्हायरल झाले. मागिल तीन चार दिवसांपासून माढा पूर्व भागामध्ये मानेगाव आरोग्य केंद्राला मिळालेल्या सात लाख रुपयांच्या निधीवरून आमदार शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे यांच्या समर्थकांमध्ये या निधीचा चांगलाच श्रेयवाद रंगला आहे.

जिल्हा परिषद मुख्य अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी एका अर्जावरून दखल घेतल्याबद्दल लांडगे यांनी मनीषा आव्हाळे यांचे आभार मानले आहेत. या मिळालेल्या सात लाख रुपयांच्या निधीमध्ये महिलांच्या प्रसूतीसाठी ऑपरेशन थिएटर, पाणीपुरवठा दुरुस्ती संरक्षण भिंत स्लॅबची दुरुस्ती व इतर कामे होणार आहेत. निधीवरून श्रेयवाद करण्यापेक्षा गावाला अजून निधी कसा मिळवता येईल याच्याकडे सर्वांनी लक्ष द्यावे.

Madha News
Baban Shinde : अजित पवार गटाच्या आमदार पुत्राला सहा महिन्यांची शिक्षा...

मानेगावचा एखादा गट किंवा एखादा वार्ड फक्त माझा नाहीतर पूर्ण मानेगाव माझे आहे, असे समजून सर्वांनी एकत्रित रस्त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मानेगावातील सर्व रस्त्यांचा प्रश्न जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्याचबरोबर मानेगाव हे फक्त पोर्टल वरती 100% हागणदारी मुक्त गाव दिसत आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे. शौचालय असली तरी शौचालयांना पाण्याअभावी त्याचा वापर होत नाही. त्यासाठी पावलं उचलणं गरजेचं आहे. श्रेय वादापेक्षा मानेगावचा विकास महत्त्वाचा आहे, असे म्हणत आमदार शिंदे पिता-पुत्रांच्या समर्थकांवर बोलणे प्रमोदिनी लांडगे यांनी टाळले.

Madha News
Jitendra Awad : 'बापाची चप्पल घातली म्हणून बाप होता येत नाही; आव्हाडांनी अजितदादांना सुनावलं...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com