Maan Political News : 'बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला'... महादेव जानकर मंत्रालयावर धडकणार

Mahadev Jankar पिंगळी (ता. माण) येथील माणदेशी सुतगिरणीवर चारा छावणी चालकांच्याकडून महादेव जानकर आणि रणजितसिंह देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.
Mahadev Jankar
Mahadev Jankarsarkarnama

-रूपेश कदम

Maan Political News : हजारो कोटी रुपये खाणारांकडे डोळेझाक करुन छावणी धारकांकडे करडी नजर करणार्‍यांना काळ माफ करणार नाही. छावणी चालकांच्या बिलाबाबत जाचक अटी संदर्भात गुरुवारी मंत्रालयात जाणार आहे. याबाबत 'बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला' अशी भूमिका घेणार असल्याचा इशारा माजी मंत्री, आमदार महादेव जानकर यांनी दिला आहे.

पिंगळी (ता. माण) येथील माणदेशी MaanDesh सुतगिरणीवर चारा छावणी चालकांच्याकडून महादेव जानकर Mahadev Jankar आणि रणजितसिंह देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना आमदार जानकर बोलत होते. यावेळी माण बाजार समितीच्या उपसभापती वैशाली विरकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने, आप्पासाहेब पुकळे उपस्थित होते.

जानकर म्हणाले, दुष्काळाची छाया गडद असताना चारा छावणी सुरु करण्यास कोणीही धजावत नव्हते. मात्र रणजितसिंह देशमुखांनी पुढाकार घेत माण-खटाव तालुक्यात छावण्या उभारल्या. शेळ्या-मेंढ्याची छावणी उभारुन एक आदर्श निर्माण केला. त्यामुळे रणजितसिंह देशमुख खऱ्या अर्थाने पशुपालक आहेत.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे दोन्ही तालुक्यात साखळी बंधारे उभारण्यापलीकडे ठोस असे काम या भागात सरकारकडून झाले नाही. मात्र,रणजितसिंह देशमुख यांनी संघर्ष करत उजाड माळरानावर सुतगिरण्या उभारल्या. मोठा भाऊ म्हणून मी कायम रणजितसिंह देशमुख यांच्या पाठीशी राहीन.

Mahadev Jankar
Satara Congress News : चोऱ्या लपविण्यासाठी शिंदे, पवार गट सत्तेत गेला : पृथ्वीराज चव्हाणांचा घाणाघात

रणजितसिंह देशमुख म्हणाले, माण-खटाव वर पुन्हा आस्मानी संकट आले असून दुबार पेरणीही पूर्णपणे संकटात आली आहे. पावसाचे प्रमाण पन्नास टक्क्यांपेक्षाही कमी आहे. त्यामुळे टंचाई परिस्थितीमधील सवलती शासनाने लागू कराव्यात.

शेतकऱ्यांसाठी लढा देणारे खासदार राजू शेट्टी व आमदार महादेव जानकर यांनी या भागाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा. छावणी चालकांच्या बिलाबाबत जाचक अटी रद्द कराव्यात आणि चारा व मका उत्पादक यांची थकलेली रक्कम तातडीने अदा करावी अशी मागणी मामूशेठ विरकर आणि अनिल पवार यांनी केली.

Edited By : Umesh Bambare

Mahadev Jankar
Maan Khatav News: माण-खटावमध्ये दुष्काळ जाहीर करण्यासाठी काँग्रेस आक्रमक...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com