Satej Patil : काँग्रेसच्या सतेज पाटलांचा दावा अन् शिंदे गटात खळबळ ?

Congress Vs Shinde Group Shivsena : दाव्यात तथ्य नसल्याचे मंत्री उदय सामंत यांचे स्पष्टीकरण...
Satej Patil, Uday Samant
Satej Patil, Uday SamantSarkarnama
Published on
Updated on

Satej Patil : देशासह राज्यात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाड्यांमध्ये जागावाटपांबाबत बैठका सुरु आहेत. त्यातूनच आता फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले असून एकमेकांविरोधात दावे-प्रतिदावे केले जात आहेत. असाच एक खळबळजनक दावा कोल्हापुरात करण्यात आला आहे.

त्याला लगेच सत्ताधारी मंत्र्याने स्पष्टीकरण दिले आहे. काँग्रेस (Congress) चे सतेज पाटील यांनी एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेतील सात खासदारांनी भाजपच्या तिकिटावर लढण्याचे लेखी दिलेले असल्याचा दावा आज कोल्हापुरात केला, तर मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी या दाव्यात तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा झाली.

Satej Patil, Uday Samant
MLA Ravindra Chavan : आमदार रवींद्र चव्हाणांची मुख्यमंत्र्यांच्या अखंड हरिनाम सप्ताहाला दांडी, चर्चांना उधाण

सतेज पाटील (Satej Patil) यांनी आज कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेना (Shivsena) सोडून गेलेल्या व महायुतीच्या सत्तेत सामील झालेल्या शिंदे गटातील सात खासदारांनी भाजपच्या तिकिटावर लढण्याचे लेखी दिले आहे, तर येत्या 10 जानेवारीला आमदार पात्रतेवर सर्व निर्णय अवलंबून असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच जागावाटपाचे सूत्र ठरल्यानंतर तत्काळ उमेदवारी देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. मंत्री उदय सामंत यांनी सतेज पाटील यांच्या या दाव्याचे स्पष्टीकरण कोल्हापुरात दिले. ते म्हणाले, सतेज पाटील यांच्या दाव्यामधे काही तथ्य नाही. आम्हाला आता धनुष्यबाण चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे शिवसेना हीआमचीच आहे.

उलट सतेज पाटील यांना कुणकुण लागली आहे की, काँग्रेसचे 9 लोक हे धनुष्यबाण किंवा कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे ते आमच्यासंदर्भात असे उलटसुलट बोलत असल्याचे सामंत यांनी सांगितले.

(Edited by Amol Sutar)

Satej Patil, Uday Samant
Solapur Politics : पवारांच्या गटातील नेत्याने घेतली अजितदादांची भेट; माजी आमदारही गळाला?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com