Assembly Election : शेट्टींना निवडणूक जड जाणार; प्रदेशाध्यक्षांचा 'स्वाभिमान' दुखावला...

Swabhimani Shetkari Sanghatna Parivartan Mahashakti Raju Shetty  Jalindar Patil : विधानसभा निवडणुकीसाठी राजू शेट्टी हे परिवर्तन महाशक्तीमध्ये सहभागी झाले आहेत.
Jalindar Patil, Raju Shetty
Jalindar Patil, Raju ShettySarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : लोकसभा निवडणुकीत एकला चलोची भूमिका घेतल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी राज्यभर दौरे केले. अशातच विधानसभा निवडणुकीत परिवर्तन महाशक्ती ही तिसरी आघाडी अस्तित्वात आली.

शेट्टी यांनी परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून सुरु केलेली नवी इनिंग त्यांच्याच संघटनेतील पदाधिकाऱ्यांना रुचलेली नाही. लोकसभा निवडणुकीत झालेले सलग दोन पराभव, चळवळ तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांचे होत असलेले खच्चीकरण, यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Jalindar Patil, Raju Shetty
Barshi Politic's : दिलीप सोपल अर्ज भरून प्रचाराला लागले; राजेंद्र राऊतांची उमेदवारी कुठे अडली?

आज होणाऱ्या 23 व्या ऊस परिषदेला संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनीच दांडी मारली आहे. महत्त्वाचे पदाधिकारी राजू शेट्टी यांच्या राजकीय भूमिकेवर नाराज आहेत. संघटनेचे नेते प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी वेगवेगळी कारणे देत ऊस परिषदेलाच दांडी मारली आहे. मात्र वास्तविक शेट्टी यांच्या राजकीय भूमिकेलाच एक प्रकारे विरोध केला असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाविकास आघाडी किंवा महायुतीला पाठिंबा द्यावा, अशी मागणी संघटनेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केली होती. मात्र माजी खासदार शेट्टी यांनी लोकसभा निवडणुकीत एकला चलोची भूमिका घेतली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत विजयाचे दावेदार असताना देखील पराभवाला सामोरे जावे लागले.

Jalindar Patil, Raju Shetty
Malshiras Constituency : उत्तम जानकर, राम सातपुते ‘वेटिंग’वर; महायुती-महाआघाडीने वाढविला माळशिरसचा सस्पेन्स

विधानसभा निवडणुकीला देखील प्रमुख पदाधिकारी एकतर महाविकास आघाडी सोबत चला किंवा महायुती सोबत चला, अशी भूमिका मांडत होते. मात्र, वारंवार स्वतःची भूमिका तीच संघटनेची भूमिका, घेत असल्याचा आरोप प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून शेट्टी यांच्यावर केला जात आहे. यावेळी देखील तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी परिवर्तन महाशक्ती आघाडी तयार करण्यात आली. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रमुख सहभाग आहे.

सातत्याने बदलणाऱ्या भूमिकेमुळे पक्षातील प्रमुखच नाराज आहेत. प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील हे देखील शेट्टी यांच्या राजकीय भूमिकेच्या विरोध आहेत. शिवाय त्यांना ही गोष्ट न पटल्याची माहिती देखील खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यापूर्वी सावकार मादनाईक यांना उतरवले होते. मात्र यंदा देखील मादनाईक हे स्वतः उतरणार आहेत की नाहीत, याबाबत शंका आहे. लोकसभा निवडणुकीत देखील कोल्हापूर मधून प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी उमेदवारीची घोषणा केली होती. मात्र त्यावेळी देखील माघार घेण्यात आली. आता होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरातील अनेक मतदारसंघात निवडणुकीसाठी अनेक जण इच्छुक आहेत. मात्र राजकीय भूमिका घेत शेट्टी हे नेहमी अडवणूक करत असतील तर आमची भूमिका नाराजीची आहे, असा सूर देखील प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

एकीकडे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील हे आजच्या 23 व्या ऊस परिषदेला अनुपस्थित आहेत. ते कौटुंबिक कारणानिमित्त येऊ शकत नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र वास्तविक पाहता हे केवळ कारण असून शेट्टींची राजकीय भूमिका त्यांना पटलेली नाही. त्यामुळेच ते या ऊस परिषदेला अनुपस्थित असल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com