Mumbai News: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही महायुतीच्या मुख्यंत्रिपदाबाबत मोठं विधान केलं आहे. मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत. याआधी फडणवीस यांनीही अशाचप्रकारे आपण मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचं स्पष्ट केलं होतं.
आता अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, 'निकालानंतरच महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय घेतला जाईल. निकालानंतर महायुतीच्या आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय होईल.',एका वृत्तपत्रास दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
याशिवाय अजित पवारांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांचेही कौतुक केले. मला अनेक मुख्यमंत्र्यांच्या हाताखील काम करण्याची संधी मिळालेली आहे. दोनवेळा मुख्यमंत्री राहिलेले विलासराव देशमुख हे सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री होते. विलासरावांनी आघाडी सरकार योग्यरित्या चालवलं. असंही अजित पवार यांनी बोलून दाखवलं.
याशिवाय ‘बटेंगे तो कटेंगे’ हे महाराष्ट्रात चालणार नाही. शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या राज्यात असली गोष्ट खपवून घेणार नाही. मी अल्पसंख्याकांच्या पाठीशी आहे, त्यामुळे कोणीही काळजी करू नका. मी यावेळी सोशल इंजिनिअरिंग केलं आहे. आम्हाला मिळालेल्या 60 जगापैकी 10 टक्के जागा मुस्लिम समाजाला दिल्या आहेत. विधान परिषदेतही मुस्लिम समाजाला संधी दिली, काँग्रेसनेही केले नाही, ते मी केले आहे, त्यामुळे सगळ्यांना एका चष्म्यातून बघू नका, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी केलेलं आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप सत्तेवर आला तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्री होतील, असे संकेत दिले होते. त्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डिवचले होते. मात्र, आता खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत भाष्य केले आहे. ‘मी मुख्यमंत्रिपदाच्या कुठल्याही शर्यतीत नाही,’ असे विधान केले आहे, त्यामुळे मुख्यमंत्रिपदाबाबतची सुरू झालेली चर्चा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.