Solapur Vidhansabha Election 2024 Result: राज्यात पिछाडीवर पडलेल्या महाआघाडीची सोलापुरात महायुतीला जोरदार टक्कर

Solapur constituency showdown Mahavikas Aghadi trailing against Mahayuti: आतापर्यंतच्या कलांमध्ये महाराष्ट्रात महायुती जवळपास 220 मतदारसंघात आघाडीवर आहे, तर महाविकास आघाडी केवळ 57 मतदारसंघात आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.
Solapur Vote Counting
Solapur Vote CountingSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 23 November : सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदासंघांचे कल जवळपास स्पष्ट झाले असून अकरांपैकी सहा मतदारासंघात महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत, महाविकास आघाडीचे पाच उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे सुरुवातीच्या कलात महाराष्ट्रात महाविकास आघाडीची जोरदार पिछेहाट होत असताना सोलापूर जिल्ह्यात मात्र आघाडीने महायुतीला जोरदार टक्कर दिल्याचे दिसून येत आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल Latest Update

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (ता. 23 नोव्हेंबर) सकाळी आठपासून सुरुवात झाली. सुरुवातीला टपाली मतांची मोजणी करण्यात आलेली आहे. आतापर्यंतच्या कलांमध्ये महाराष्ट्रात महायुती जवळपास 220 मतदारसंघात आघाडीवर आहे, तर महाविकास आघाडी केवळ 57 मतदारसंघात आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.

महाराष्ट्रातील निकालाची प्रत्येक घडामोड - येथे क्लिक करा...

राज्यभरात महाविकास आघाडीचा सुपडासाफ होत असताना सोलापूर जिल्ह्यात मात्र महाविकास आघाडीने महायुतीला जोरदार टक्कर दिल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील अक्कलकोट, माळशिरस, सोलापूर दक्षिण, सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य, बार्शी या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेतली आहे.

महाविकास आघाडी पंढरपूर, मोहोळ, करमाळा, माढा या मतदारसंघात आघाडीवर आहे. सांगोला मतदारसंघात शेतकरी कामगार पक्ष आपली गमावलेली जागा परत मिळविण्याचा मार्गावर आहे.

महायुतीचे सोलापूर शहर उत्तरमधून विजयकुमार देशमुख, सोलापूर दक्षिणमधून सुभाष देशमुख, अक्कलकोटमधून सचिन कल्याणशेट्टी, सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून देवेंद्र कोठे, माळशिरसमधून राम सातपुते, तर बार्शीतून राजेंद्र राऊत हे आघाडीवर आहेत.

Solapur Vote Counting
Solapur Assembly Election Result : सोलापुरात पहिल्या काही फेऱ्यांत हे उमेदवार आघाडीवर....

महाविकास आघाडीचे पंढरपूरमधून भगीरथ भालके, मोहोळमधून राजू खरे, करमाळ्यातून नारायण पाटील, तर माढ्यातून अभिजीत पाटील हे आघाडीवर आहेत. सांगोल्याचे शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख हे आघाडीवर आहेत, त्यामुळे सोलापुरात महाविकास आघाडीने महायुतीला जोरदार तडाखा दिल्याचे मानले जात आहे.

सोलापूर जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय आघाडीवरील उमेदवार

करमाळा (अकरावी फेरी) : नारायण पाटील 19703 मतांनी आघाडीवर (महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष)

मोहोळ (दहावी फेरी) : राजू खरे 16581 मतांनी आघाडीवर (महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष)

सोलापूर शहर मध्य (आठवी फेरी ) : देवेंद्र कोठे 25 हजारांनी आघाडीवर (महायुती भाजप)

माढा (आठरावी फेरी ) : अभिजीत पाटील १७२७८ मतांनी आघाडीवर (महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष)

अक्कलकोट (दहावी फेरी) : सचिन कल्याणशेट्टी 34000 मतांनी आघाडीवर (महायुती भाजप)

सोलापूर दक्षिण (नववी फेरी) : सुभाष देशमुख 24405 मतांनी आघाडीवर (महायुती भाजप)

Solapur Vote Counting
Kothrud Election Result 2024 : महायुतीला 160 जागा मिळणार पण मुख्यमंत्री..., मतमोजणीला सुरूवात होताच चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य

बार्शी : राजेंद्र राऊत 20715 आघाडीवर (महायुती शिवसेना)

माळशिरस अकराव्या फेरीअखेर राम सातपुते 8530 मतांनी आघाडीवर (महायुती भाजप)

सोलापूर शहर उत्तर (अकरावी फेरी) : विजयकुमार देशमुख हे २७२०० मतांनी आघाडीवर (महायुती भाजप)

सांगोला (नववी फेरी) : बाबासाहेब देशमुख ८३६५ मतांनी आघाडीवर (शेकाप, महाविकास आघाडी)

पंढरपूर (अकरावी फेरी) : भगीरथ भालके 1121 आघाडी (महाविकास आघाडी)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com