Sharad Pawar: ऐन निवडणुकीत शरद पवारांनी जयंत पाटलांवर सोपवली मोठी जबाबदारी

Sharad Pawar Election Strategy: उद्याचा महाराष्ट्र सावरण्यासाठी आणि प्रगती घडवण्यासाठी मोलाची कामगिरी याच परिसरातून होणार आहे असं शरद पवारांनी सांगलीच्या सभेत जाहीर केलंय.
sharad pawar
sharad pawar sarkarnama
Published on
Updated on

Sangali News: विधानसभेसाठी महाविकास आघाडीचे जागा वाटपाबाबत आज बैठक होत असून पुढील आठवड्यात जागा वाटप जाहीर होणार असल्याची माहिती आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. उमेदवारी ठरवण्याबाबतचा अंतिम निर्णय जयंत पाटील हे घेतील, असे शरद पवार यांनी गुरुवारी स्पष्ट केले. ते आज कराडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जागा वाटपाबाबत निर्णय अजून झाला नसल्याने महाविकास आघाडीच्या जागा वाटपाला फॉम्युला पुढील आठवड्यात जाहीर होणार असल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवार मिळावी, यासाठी पक्षातील व अन्य पक्षातील इच्छुक चाचपणी करीत आहेत.

पक्षाच्या उमेदवारांची घोषणा कधी होईल, याबाबत शरद पवार यांनी विचारले असता त्यांनी सांगितले की उमेदवार निवडण्याबाबतचा अंतिम निर्णय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे घेणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा बुधवारी इस्लामपूरमध्ये पोहोचली. या यात्रेची सांगता सभाप्रसंगी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा गेल्या 24 दिवसांपासून सुरू आहे.

sharad pawar
NCP News: राष्ट्रवादीत नाराजी नाट्य; 'एक व्यक्ती एक पद" धोरणाचं काय? दोन नेत्यांचा अजितदादांना सवाल

काल (बुधवारी) इस्लामपूरमध्ये या यात्रेची सांगता सभा झाली. इस्लामपूर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे या सभेला महत्त्व प्राप्त झाले होते.

यावेळी त्यांनी जयंत पाटील यांच्याबाबत त्यांनी मोठ विधान केले होते. जयंत पाटील यांनी उद्याचा महाराष्ट्र घडवण्याची जबाबदारी घ्यावी असं विधान शरद पवार यांनी केलंय. उद्याचा महाराष्ट्र सावरण्यासाठी आणि प्रगती घडवण्यासाठी मोलाची कामगिरी याच परिसरातून होणार आहे असं शरद पवारांनी सांगलीच्या सभेत जाहीर केलंय. त्यामुळे जयंत पाटील हे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार आहेत का याची चर्चा आता सुरु झाली आहे.

महायुतीच्या पत्रकार परिषदेत महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण, असा प्रश्न विचारण्यात आला होता.त्यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते की आमच्याकडे मुख्यमंत्रीपदाचे कुणालाही डोहाळे लागलेले नाही. आमचं काम हाच आमचा चेहरा आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आता विरोधी पक्षनेत्यांच्या चेहरा ठरवावा, असा खोचक टोला त्यांनी आघाडीला लगावला. यावर शरद पवार यांना आज पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, "मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल हे आम्ही निवडणुकीनंतर ठरवू, आता चर्चा करणे योग्य नाही,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com