Shaktipeeth : फडणवीसांच्या ड्रिम प्रोजेक्ट 'शक्तीपीठ'ला तीव्र विरोध; शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा, महामार्गासाठी जमीन नाहीच

kameri gram panchayat oppos to shaktipeeth highway Project : महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाला सांगली जिल्ह्यातील एका गावाने विरोध केला आहे. तर एकमुखी ठराव संमत करत कोणत्याही परिस्थितीत सुपीक जमिनी न देण्याचा निर्णय केला आहे.
CM Devendra Fadnavis dream project Shaktipeeth Highway
CM Devendra Fadnavis dream project Shaktipeeth HighwaySarkarnama
Published on
Updated on
Summary
  • कामेरी ग्रामपंचायतीने शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविला

  • ग्रामसभेत एकमुखी ठराव करून सुपीक जमीन देण्यास नकार देण्यात आला

  • या निर्णयामुळे प्रकल्पावर पुढील अडचणी निर्माण होण्याची शक्यता

sangli farmers protest news : महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाला कामेरी ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत तीव्र विरोध दर्शवित एकमुखी ठराव संमत करण्यात आला. ‘आमच्या सुपीक जमिनी कोणत्याही परिस्थितीत महामार्गासाठी देणार नाही, ’ असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच रणजित पाटील होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य जयराज पाटील, तालुका पंचायत समिती सदस्य शुभम पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

चर्चेदरम्यान शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी मांडताना बागायती शेतीवर मोठा परिणाम होणार असल्याचे सांगितले. ज्येष्ठ नेते सी. बी. पाटील म्हणाले, महामार्गामुळे शेतीचे मोठे नुकसान होईल. हा प्रकल्प रद्द करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहोत.

शुभम पाटील म्हणाले, शेतीच्या नुकसानीमुळे तरुणांच्या रोजगारावर परिणाम होईल. ही मागणीच केलेली नसताना प्रकल्प शेतकऱ्यांवर लादू नये, असे शहाजी पाटील यांनी नमूद केले. रिपब्लिकन पक्षाचे सचिन जाधव यांनी या आंदोलनाला पक्षाचा पाठिंबा जाहीर केला. शेतकऱ्यांच्या हितासाठी हा लढा अखंड सुरू ठेवू, असे आंदोलनाचे समन्वयक प्रा. अनिल पाटील यांनी स्पष्ट केले.

CM Devendra Fadnavis dream project Shaktipeeth Highway
shaktipeeth highway : फडणवीसांच्या ड्रिम प्रोजेक्टला शिवसेनेच्या माजी मंत्र्याचा विरोध? म्हणे, 'नवा मार्ग कोकणावर अन्याय करणारा'

सरपंच रणजित पाटील म्हणाले, ग्रामस्थांचा तीव्र विरोध लक्षात घेऊन आजचा ठराव तहसीलदार, जिल्हाधिकारी व मुख्यमंत्र्यांकडे सादर केला जाईल. हा ठराव सुनील पाटील यांनी मांडला असून सी. बी. पाटील यांनी अनुमोदन दिले. ग्रामस्थांनी एकमुखी समर्थन दर्शवत ठराव मंजूर केला.

चर्चेत प्रवीण पाटील, मोहन पाटील, इंद्रजित पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य. छाया पाटील, दिलीप जाधव, जगोद्धार पाटील, माजी उपसरपंच तानाजी माने, डॉ. रणजित पाटील, पैलवान पोपट पाटील आदींनी सहभाग घेतला. यावेळी उपसरपंच नंदकुमार पाटील, सुनील भीमराव पाटील, सुजाता पाटील, माजी पंचायत समिती सदस्य छगन पाटील आदी उपस्थित होते.

CM Devendra Fadnavis dream project Shaktipeeth Highway
Shaktipeeth Highway : फडणवीसांच्या ड्रिम प्रोजेक्टचा केंद्र सरकारच्या निर्णयाला धक्का? 'शक्तीपीठा'मुळे ‘इको-सेंसिटिव्ह झोन’ मधील गावांचा प्रश्न ऐरणीवर

FAQs :

1. शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला विरोध का केला जात आहे
सुपीक शेती जमीन गमावण्याची भीती असल्यामुळे ग्रामस्थांनी विरोध केला आहे

2. कोणत्या गावाने हा ठराव मंजूर केला
कामेरी ग्रामपंचायतीने एकमुखी ठराव मंजूर केला

3. ग्रामसभेत काय निर्णय घेण्यात आला
महामार्गासाठी जमीन देणार नाही असा ठाम निर्णय घेण्यात आला

4. या निर्णयाचा प्रकल्पावर काय परिणाम होऊ शकतो
प्रकल्पाच्या अंमलबजावणीला अडथळे निर्माण होऊ शकतात

5. या प्रकरणात पुढे काय होऊ शकते
सरकार आणि ग्रामस्थांमध्ये चर्चा किंवा आंदोलन वाढण्याची शक्यता आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com