PM Modi Solapur Tour : ‘महाराष्ट्राची निवडणूक म्हणजे महायुतीचा ट्रॅक रेकॉर्ड Vs महाआघाडीचा खोटा ट्रॅप रेकॉर्ड’

PM Modi in Solapur : खोटा ट्रॅप रेकॉर्ड त्यांनी हरियाणातही वाजवला होता. मात्र, तिथल्या जनतेने काँग्रेसवाल्यांना बरोबर ओळखून पूर्णतः नाकारले. झारखंड आणि महाराष्ट्रात शाही परिवाराचे सर्व चेलेचपाटे जनता घरी पाठवणार आहे.
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 12 November : महाराष्ट्राची ही निवडणूक महायुतीचा ट्रॅक रेकॉर्ड आणि महाआघाडीच्या खोट्या ट्रॅप रेकॉर्डमध्ये होते आहे. आमचा ट्रॅक रेकॉर्ड म्हणजे महायुतीच्या विकासाचा रोड मॅप आणि महाआघाडीचा खोटा ट्रॅप रेकॉर्ड म्हणजे काँग्रेसची जुनी झूट की दुकान आहे. या निवडणुकीत ते खोट्या अफवा पसरवत आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले.

महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची सभा झाली. त्या सभेत मोदी यांनी महाविकास आघाडीच्या धोरणांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, खोटा ट्रॅप रेकॉर्ड त्यांनी हरियाणातही वाजवला होता. मात्र, तिथल्या जनतेने काँग्रेसवाल्यांना बरोबर ओळखून पूर्णतः नाकारले. झारखंड आणि महाराष्ट्रात शाही परिवाराचे सर्व चेलेचपाटे जनता घरी पाठवणार आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक कानकोपऱ्यातून एकच आवाज येतोय, ‘महायुतीचे सरकार पाहिजे.’ या मजबूत आवाजाला आणि महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा.

मोदी म्हणाले, सोलापूर (Solapur) शुगर बेल्ट आहे. त्यामुळे आमचं सरकार 3150 रुपये उसाचा दर केला आहे. मोदी प्रधानमंत्री बनले तेव्हाच इथेनॉल टेक्नॉलॉजी आली का. मात्र, अगोदरच्या सरकारला तुमची परवा नव्हती, तुम्हाला तडपडवण्यात त्यांना मजा यायची. काँग्रेसच्या वेळेस पेट्रोलमध्ये 2 ते 3 टक्के इथेनॉल मिसळलं जायचं. मात्र माझं सरकार आले तेव्हा आपण हे 15 टक्केने वाढवलं आणि मी 20 टक्यांचं लक्ष ठेवलं आहे.

इथेनॉलच्या बदल्यात 80 हजार करोड रुपये उस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले आहेत. महाराष्ट्रातील उस उत्पादक शेतकऱ्यांना डबल फायदा मिळतोय, असा दावा मोदी यांनी केला.

Narendra Modi
Pandharpur Politic's : पंढरपुरात परिचारक, भालकेंना धक्का; सहा नगरसेवकांचा पवारांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा

नरेंद्र मोदी म्हणाले, सोलापूरची चादर पूर्ण देशात प्रसिद्ध आहे. देशात युनिफॉर्मचं नाव येत तेव्हा सोलापूरच नाव सर्वात अगोदर येतं. काँग्रेस सरकारने याचा कधीही विचार नाही केला, अशा कामगारांसाठी आमचं सरकार पीएम विश्वकर्मा योजना चालवत आहे. महाराष्ट्रात आम्ही टेक्सटाईल पार्क बनवत आहोत, याचा सोलापूरच्या उद्योगाला फायदा होईल. या भागातील विडी कामगारांबद्दल कोणी विचार केला नाही. मात्र, आम्ही 15 हजार घरे बनवून यांना दिली आहेत. आमची नियत साफ असल्याचा हा पुरावा आहे. मात्र, महाआघाडीच्या नियतीच खोटी आहे.

काँग्रेस ही देशातील गरीब आणि वंचितांना संविधानाच्या माध्यमातून मिळालेल्या अधिकार संपवू पाहत आहे. आणि शहजादे (राहुल गांधी) तर विदेशात जाऊन आरक्षण संपावण्याची भाषा बोलून आले आहेत. काँग्रेसची ही आरक्षण संपावण्याची इच्छा नवी नाही. एकवेळ अशी होती जेव्हा काँग्रेस आरक्षण संपवण्यासाठी खुल्या पद्धतीने वर्तमानपत्रात मोठमोठ्या जाहिराती द्यायचे. काँग्रेसने आपल्या सिम्बॉलमधून आरक्षण संपवून मतं मागण्याचा प्रयत्न केले आहे. इंटरनेट हे सर्व उपलब्ध आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मोदी म्हणाले, आरक्षणाचा लाभ घेणारे sc, st आणि obc च्या विरोधात काँग्रेस कशी भाषा वापरत आहे, हे पडतळून बघा. मात्र आता दलित, obc, आदिवासी एकजूट होत आहे, त्यामुळे काँग्रेसवाले सर्वात जास्त चिंतीत आहेत. कारण हे सर्वजण एकत्र आले तर शाही खानदाानला खुर्ची कशी मिळणार, त्यामुळे काँग्रेस आता दलित, मागासवर्गीय आणि आदिवासींना छोट्या छोट्या तुकड्यात तोडण्याचं षडयंत्र करत आहेत.

Narendra Modi
Modi Solapur Sabha : सोलापूरसोबतच्या नात्यावर मोदींचे भरसभेत भाष्य; ‘सोलापूरला आलो नाही, तर मी बेचैन होतो...’

एका जातीला दुसऱ्या जातीशी लढवून तुकडे करण्याचं पाप कर्म करण्यासाठी काँग्रेस नवीन खेळ खेळत आहे. ओबीसी समाज एकजूट नसेल तर जाती जातीत वाटलं जाईल, तेंव्हाच काँग्रेसला ऑक्सिजन मिळेल. तुम्ही दलितांमध्ये भांडण लावण्याच्या काँग्रेसच्या या मनसुब्याला फेल करण्यासाठी आपल्याला एक राहावं लागेल, त्यामुळे आपण ‘एक हैं तो सेफ हैं, हम एक हैं तो सेफ हैं’ असा नवा नाराही मोदी यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com