Solapur News: विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली वाढताना दिसून येत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 1 जून आहे. मात्र,अद्यापही महायुती किंवा महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आलेला नाही. काही जागांवर महायुतीचं घोडं अडून बसलं आहे. अशातच सोलापूरमधून महत्त्वाची अपडेट समोर येत आहे.
विधान परिषदेच्या राज्यातील 6 जागांवर शिवसेना ठाम असून भाजप मात्र, चार जागा सोडण्यास तयार आहे. तर राष्ट्रवादीकडूनही तीन जागांची मागणी करण्यात आली असून त्यात पुण्याच्या जागेसाठी ते आग्रही आहे. भाजपनंही या जागेसाठी ताकद लावली आहे. पण एकीकडे जागावाटपाचा घोळ मिटला नसतानाच शिवसेनेच्या इच्छुक शिलेदारानं थेट उमेदवारी अर्जच दाखल केला आहे.
सोलापुरातून विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेना नेते रमेश बारसकर यांनी आपला उमेदवारी अर्ज शुक्रवारी (ता.29) दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी बारसकर यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सोलापुरात शिवसेनेला विश्वासात घेतले जात नसून,निधीही दिला जात नसल्याचा आरोपही केला आहे.
भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महायुतीतील तीनही पक्षांनी अद्याप उमेदवारांबाबतचा सस्पेन्स कायम ठेवलेला आहे. तर दुसरीकडे सर्वच इच्छुकांनीही विधान परिषदेसाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे.
तसेच सोलापूर विधानपरिषदेची निवडणूक सध्यातरी भाजपासाठी एकतर्फी समजली जाते. आता हीच निवडणूक बिनविरोध करत इतिहास घडवण्यासाठी भाजप प्रचंड आग्रही भूमिकेत आहेत.
अशातच आता सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. भाजपकडून विधान परिषदेच्या सोलापूरच्या जागेवर महिलेला संधी देण्याच विचार सुरू आहे. एकनाथ शिंदेंनी राज्यसभेच्या निवडणुकीत जो धक्कातंत्राचा वापर करत तोच डाव आता विधान परिषेदच्या निवडणुकीत टाकण्याच्या तयारीत आहे.
भाजपकडून सोलापूर विधान परिषदेच्या जागेच्या उमेदवारीसाठी माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, राजेंद्र राऊत ,विक्रम देशमुख, शिवाजीराव सावंत यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे.
भाजप विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महिला उमेदवार देण्याबाबत जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यात रश्मी बागल,डॉ. श्रद्धा जवंजाळ आणि राजश्री नागणे या तीन महिला नेत्यांची नावं आघाडीवर असल्याची चर्चा आहे. या तीनपैकी कोणतं नावावर शिक्कामोर्तब करायचा याचा निर्णय पालकमंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घेणार असल्याचं बोललं जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.