संघर्षशील नेतृत्व महाराष्ट्राने गमावले : राधाकृष्ण विखे पाटलांची शोक संवेदना

शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार विनायक मेटे ( Vinayak Mete ) यांचे आज पहाटे पाच वाजता अपघाती निधन झाले.
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil Sarkarnama
Published on
Updated on

Tribute to Vinayak Mete : अहमदनगर - शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार विनायक मेटे ( Vinayak Mete ) यांचे आज पहाटे पाच वाजता अपघाती निधन झाले. मुंबई-पुणे दुर्तगती महामार्गावर हा अपघात झाला. मेटे यांच्या निधनाने एक संघर्षशील नेतृत्व महाराष्ट्राने गमावले असल्याची शोक संवेदना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी व्यक्त केली.

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाचे वृत अत्यंत धक्कादायक होते. मागील अनेक वर्षे त्यांच्याशी मित्रत्वाचे एक नाते होते. विविध प्रश्नाच्या संदर्भात त्यांनी सदैव आग्रही भूमिका असायची. अतिशय सामान्य कुटुंबातून पुढे आलेले ते व्यक्तिमत्व होते, असे त्यांनी सांगितले

ते पुढे म्हणाले की, राज्यात मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्यांनी सातत्याने वेगवेगळ्या स्तरावर संघर्ष केला.सरकार कोणातेही असो ते आपल्या मागण्यांपासून थोडेही दूर गेले नाहीत.प्रश्नांचा पाठपुरावा करणारा नेता हीच त्यांची समाजाच्या सर्व घटकामध्ये ओळख होती.

भाजप सरकारने अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे विनायक मेटे अध्यक्ष होते. स्मारकाच्या कामाचा पाठपुरावा त्यांचा सुरूच होता. जनसामान्यांशी बांधिलकी मानणारे नेतृत्व या दुर्दैवी घटनेन आपल्यातून हिरावून घेतले आहे, अशा शब्दात मंत्री विखे पाटील यांनी विनायक मेटे यांना श्रध्दांजली अर्पण केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com