ATS Raid : पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या पुणे कनेक्शनवर ATS ची मोठी धाड, ४५ जण ताब्यात; जिल्हाभर खळबळ

Maharashtra police and Maharashtra ATS raid in Pune : पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्या संपर्कात असलेल्या संशयितांवर महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने एकाच वेळी मोठी कारवाई केली आहे.
Maharashtra ATS News
Maharashtra ATS NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात आज मोठी कारवाई करण्यात आली आहे. थेट पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्या संपर्कात असलेल्या संशयितांवर महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने एकाच वेळी मोठी धाड टाकली आहे. या धडक धाडसत्रात आतापर्यंत तब्बल ४५ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, यामुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी किंवा त्याच्याशी संबंधित संशयास्पद खात्यांशी हे संशयित थेट संपर्कात होते. एटीएसच्या रडारवर अशा जवळपास ६६ व्यक्ती होत्या, ज्यांच्या हालचालींवर गेल्या काही दिवसांपासून अत्यंत बारीक नजर ठेवली जात होती.

अखेर आज पहाटेच्या सुमारास एटीएसच्या पथकांनी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण भागातील संशयितांच्या ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकून कारवाईचा धडाका सुरू केला आहे.

Maharashtra ATS News
ATS Raid : रत्नागिरीत खळबळ! चिपळूणमध्ये एटीएसची धाड, पाकिस्तान कनेक्शन प्रकरणात एकाला उचलले

ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांकडून मोठ्या प्रमाणावर मोबाईल फोन, डिजिटल उपकरणे आणि इतर इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त करण्यात आले आहेत. हे संशयित केवळ सोशल मीडियावरील चॅटिंग आणि रील्सपुरतेच मर्यादित होते की यामागे एखादे मोठे आंतरराष्ट्रीय नेटवर्क किंवा देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारे छुपे कट कारस्थान रचले जात होते, याचा सखोल तपास आता एटीएसचे वरिष्ठ अधिकारी करत आहेत.

Maharashtra ATS News
Kolhapur Sangli ATS Raids : धक्कादायक! कोल्हापूर, सांगलीतील चार जण दहशतवाद्यांच्या संपर्कात, एटीएसच्या छाप्यानंतर प्रशासन अलर्ट मोडवर

अद्याप या संवेदनशील प्रकरणात एटीएस किंवा पुणे पोलिसांनी अधिकृतपणे कोणतीही माहिती जाहीर केलेली नसली, तरी या धडक कारवाईमुळे आगामी काळात या प्रकरणात अनेक मोठे आणि धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com