
Kolhapur News: राज्यातील महानगरपालिकेचे प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली आहे. कोल्हापुरातील कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकेची प्रभाग रचना देखील जाहीर होणार होते. कोल्हापूर महानगरपालिकेची जाहीर झाल्यानंतर बुधवारी तांत्रिक कारणामुळे इचलकरंजी महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली नव्हती.
तांत्रिक कारणास्तव या प्रक्रियेस विलंब झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळ अनेक दिवसांपासून प्रारूप प्रभाग रचनेच्या प्रतीक्षेत असलेल्या राजकीय नेतेमंडळींसह इच्छुक निराश झाले. आज प्रारुप प्रभाग रचना जाहीर होणार आहे.इचलकरंजी महापालिकेची प्रारुप प्रभाग रचना आज जाहीर होणार होती. त्यामुळे सकाळपासूनच इच्छुकांच्या नजरा याकडे लागल्या होत्या.
दुपारी ३ पर्यंत याबाबतची प्रक्रिया पूर्ण होईल, अशी सर्वांची अटकळ होती; पण रात्री उशिरापर्यंत विलंब होत गेला. याबाबत महापालिकेसह प्रसार माध्यमांकडेही विचारणा केली जात होती. विलंब होण्याचे नेमके कारण स्पष्ट होत नसल्यामुळे उलट-सुलट चर्चेला तोंड फुटले होते. महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, उपायुक्त नंदू परळकर हे मुंबईत निवडणूक आयोगाच्या कार्यालयात दिवसभर उपस्थित होते.
त्यांच्याकडेही विचारणा केली जात होती. मात्र, नेमकी माहिती समोर येत नसल्यामुळे गोंधळाची परिस्थिती होती. अखेर रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास प्रारुप प्रभाग रचना जाहीर होण्याची प्रक्रीया एक दिवस लांबणीवर पडल्याचे स्पष्ट झाले. कोल्हापूर महापालिकेची आज प्रारुप प्रभाग रचना जाहीर झाली. पण इचलकरंजी महापालिकेच्या प्रारुप प्रभाग रचना जाहीर होण्यास विलंब का, असा सवालही समाज माध्यमातून उपस्थित केला जात होता.
विशेषतः इच्छुक मंडळीमध्ये धाकधुक वाढली होती. या प्रक्रियेनंतरच पुढील राजकीय हालचाली गतीमान होणार आहेत. इच्छुकांनाही पक्षीय पातळीवर उमेदवारीसाठी फिल्डींग लावणे सोपे होणार आहे. इचलकरंजी महापालिकेची पहिलीच सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्यामुळे शहरवासियांमध्येही मोठी उत्सुकता आहे. महापालिका स्थापन होवून तीन वर्षे झाली आहेत. स्थापनेपासून प्रशासकराज आहे. इचलकरंजी महापालिकेसाठी एकूण १६ निवडणूक प्रभाग असून ६५ इतकी सदस्य संख्या आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.