Eknath Shinde News : बाळासाहेबांची परंपरा मुख्यमंत्री शिंदे कायम ठेवणार; कोल्हापुरात शिवसेनेचं...

Shivsena News : बाळासाहेब ठाकरेंनी सुरु केली होती कोल्हापुरात 'ही' परंपरा...
Eknath Shinde News
Eknath Shinde NewsSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाचे (शिंदे गट) राष्ट्रीय अधिवेशन कोल्हापुरात पार पडणार आहे. गेल्या काही वर्षापासून या अधिवेशनात खंड पडला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरु केलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाची परंपरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा सुरु केली असून, प्रथमच कोल्हापूर येथे होणार आहे. गुरुवार 15 ते 17 फेब्रुवारी दरम्यान शिवसेनेचे राष्ट्रीय महाअधिवेशन होणार असून, 17 फेब्रुवारी रोजी शिवसंवाद मेळावा होणार आहे. (Latest Marathi News)

Eknath Shinde News
Sharad Pawar Group NCP : शरद पवार गटाचा कवितेतून भाजपला टोला; म्हणाले, 'शेंबडं पोर...'

अंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची जाहीर सभा पार पडणार असून देशभरातून शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी कोल्हापुरात येणार आहे. त्यामुळे शिवसेनेचा भगवा झंझावात कोल्हापुरात निर्माण करण्याची संधी कोल्हापूरच्या शिवसैनिकांना मिळाणार आहे. या महाअधिवेशनावर शिवसेनेचे देशातील व राज्यातील भवितव्य अवलंबून असणार असून शिवसेनेचे राष्ट्रीय महाअधिवेशन यशस्वी करण्यासाठी कामाला लागा, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्षआमदार राजेश क्षीरसागर यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोल्हापुरातील या राष्ट्रीय अधिवेशन आणि शिवसंवाद मेळाव्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेवरील जबाबदारी वाढणार आहे. कोल्हापुरात (Kolhapur) होणारा आगामी कार्यक्रम यापूर्वीच्या कार्यक्रमांना तोडीस तोड असा झाला पाहिजे आणि याचा परिणाम राज्याच्या राजकीय क्षेत्रात उमटण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन शिवसेनेच्या सर्वच पदाधिकारी व शिवसैनिकांनी करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

Eknath Shinde News
Ashok Chavan In BJP: भाजप प्रवेशादरम्यान अशोक चव्हाण चुकले, फडणवीसांनी सावरले

15 ते 17 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या महाअधिवेशनामध्ये 15 तारखेला देशभरातील व राज्यातील शिवसेना नेते, मंत्री, प्रवक्ते, उपनेते, खासदार, आमदार यांच्यापासून तळागाळातील पदाधिकारी यांची नोंदणी केली जाणार आहे. 16 तारखेला सकाळी व दुपारी आणि दि. 17 रोजी सकाळी अशा तीन सत्रात महाअधिवेशन होणार आहे. यानंतर 17 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा देखील होणार आहे. गेल्यावर्षी तपोवन मैदानात झालेली सभा रेकॉर्ड ब्रेक करणारी होती. त्याचप्रमाणे दि. 17 रोजी होणारी सभा तोडीसतोड अशी असावी, त्यामुळे शिवसेनेचे (Shivsena) राष्ट्रीय महाअधिवेशन यशस्वी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com