Maharashtra Youth Congress : महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांवर नामुष्की; सख्खा भावानेच 'पंजा' सोडला; भाजप आमदाराने बरोबर हेरलं!

Maharashtra Youth Congress News: कऱ्हाड नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी भाजपच्या (BJP) प्रचाराचा प्रारंभ महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी आमदार डॉ. भोसले यांनी अभिवादन केले.
Congress , BJP
Congress , BJP Sarkarnama
Published on
Updated on

karad News : काँग्रेस देशातील जुना पक्ष आहे. कऱ्हाड दक्षिणमध्ये काँग्रेस सोडून कोणताही उमेदवार निवडून येणार नाही असे काँग्रेसचे नेते सांगत होते. पण एका वर्षातच परिस्थिती अशी आहे की युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा सख्खा भाऊही काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवत नाही, तो आघाडीतून अर्ज भरतो आहे, हा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी कुतूहलाचा भाग आहे, असा टोला भाजपचे कऱ्हाड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाला लगावला.

कऱ्हाड ( जि. सातारा) नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी भाजपच्या (BJP) प्रचाराचा प्रारंभ महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी आमदार डॉ. भोसले यांनी अभिवादन केले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांचे सख्खे बंधू ऋतुराज मोरे यांनी काँग्रेसऐवजी राजेंद्र यादव यांच्या यशवंत विकास आघाडीकडून अर्ज दाखल केला आहे. यावरूनच भोसले यांनी काँग्रेसच्या नेतृत्वात टीकेचे बाण सोडले.

Congress , BJP
भाजप - MIM आमनेसामने, Yogesh Kshirsagar यांचा आरोप।Beed Rada Viral Video, BJP Election 2025।

डॉ. अतुल भोसले म्हणाले, 'काँग्रेस (Congress) देशातील जुना पक्ष आहे. पण कऱ्हाड नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस उभी राहणार की नाही याबाबतच शंका वाटते. त्यांचा एक गट लढणार, तर दुसरा गट लढणार नाही, अशी परिस्थिती आहे. कऱ्हाड दक्षिणमध्ये काँग्रेस सोडून कोणताही उमेदवार निवडून येणार नाही, असे काँग्रेसचे नेते सांगत होते आणि आज एका वर्षातच परिस्थिती अशी झाली आहे की युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा सख्ख्या भाऊही काँग्रेसच्या चिन्हावर लढू शकत नाही, तो आघाडीतून अर्ज भरतो. हा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी कुतूहलाचा भाग आहे.'

Congress , BJP
Raju Shinde : ठाकरेंना रामराम केलेल्या नेत्याचा 9 महिन्यांनंतर भाजप प्रवेश; थेट राजस्थानच्या राजभवानातून सूत्र फिरली?

कऱ्हाडमध्ये आमची लढाई लोकशाही आघाडी, यशवंत विकास आघाडी आणि शिवसेनेच्या आघाडीसोबतच आमचा प्रमुख सामना होणार असल्याचे स्पष्ट करुन आमदार डॉ. भोसले म्हणाले, कऱ्हाडच्या नगराध्यक्ष पदासाठी विनायक पावसकर हे योग्य उमेदवार पक्षाने दिलेले आहेत. गेल्या 35 वर्षांपासून पक्षासाठी पावसकर यांनी सातत्याने पक्षासाठी काम केले. कठीण काळातही त्यांनी भाजपचे चिन्ह पुढे नेले.

Congress , BJP
Ravi Rana Vs Bachchu Kadu: 'बच्चू कडुंच्या अवैध संपत्तीचा डेटा मुख्यमंत्र्यांकडे..!'; रवी राणा यांचा खळबळजनक दावा

नगराध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवारांचा चारित्र्य, अनुभव आणि त्यांनी केलेल्या कामाचा बारकाईने अभ्यास करूनच कोअर कमिटीने विनायक पावसकर यांच्या नावाची निवड केली आहे. त्यातून कुणावर अन्याय झाला नाही. विधानसभेसारखाच विश्वास कऱ्हाडची जनता नगरपालिकेच्या निवडणुकीतही दाखवेल आणि 3 डिसेंबरला कऱ्हाडचा नगराध्यक्ष भाजपचाच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Congress , BJP
BJP Strategy : एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांविरोधात भाजपचे डबल इंजिन ; विरोधात लढलेल्या दोन्ही उमेदवारांच्या हातात कमळ

भाजपकडून कोणाचीही फसवणूक नाही

माजी उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील यांनी भाजप फसवा पक्ष आहे, अशी टीका केली. यावर आमदार भोसले म्हणाले, विधानसभेला जयवंतराव पाटील यांनी मला मदत केली होती. नगराध्यक्षपदासाठी 18 जण इच्छुक होते. त्यातून 5 जण रिंगणात राहिले. आमदार म्हणून कुणालाही शब्द देण्याचा मला अधिकार नाही. मी कुणालाही शब्द दिलेला नाही. तो अधिकार मला नाही. जो निर्णयावरुन आला त्याप्रमाणे आम्हाला काम करणे भाग आहे. लोकशाहीत त्यांना योग्य वाटेल तो निर्णय घेतला आहे. त्यामुळे फसवणूक आम्ही केलेली नाही.

Congress , BJP
NCP Politics : प्रदीप गारटकरांनी जमवलेली गट्टी दत्तामामा भरणेंना जड जाणार? इंदापुरात अजितदादा अधिक लक्ष घालणार!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com