

Nagpur News : माजी मंत्री बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात नेहमीच शाब्दिक खडाजंगी सुरू असते. बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसाठी मोठे आंदोलन केले. नागपूरचे रस्ते बंद केले. वाहतुकीची कोंडी केली होती. मात्र, हे सर्व त्यांनी शेतकऱ्यांसाठी नव्हे तर स्वतःच्या राजकीय पुनर्वसनासाठी केल्याचा थेट आरोप रवी राणा यांनी केला. आंदोलने व ब्लॅकमेलिंग करून बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी जमवलेल्या अवैध संपत्तीचा डेटा मुख्यमंत्र्यांकडे पोहोचला असल्याचा खळबळजनक दावाही राणा यांनी केला.
अमरावती लोकसभेच्या निवडणुकीत बच्चू कडू यांनी भाजप महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याविरोधात उमेदवार उभा केला होता. विधानसभेच्या निवडणुकीतही त्यांनी रवी राणा यांच्यासह अनेक ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते. त्यावेळी दोघांनी एकमेकांना बघून घेऊ असे आव्हान दिले होते.
लोकसभेत नवनीत राणा पराभूत झाल्यानंतर त्यांच्यातील वाद टोकाला गेले आहे. विधानसभेच्या निवडणुकीत राणा कुटुंबीयांनी याचे उट्टे काढले. कडू मोठ्या फरकाने पराभूत झाले. बच्चू कडू उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात होते. तेव्हा त्यांना शेतकऱ्यांची चिंता नव्हती. आता पराभूत झाल्यानंतर त्यांना शेतकरी आणि कर्जमाफी आठवल्याचे टोलाही रवी राणा (Ravi Rana) यांनी हाणला.
शेतकऱ्यांची चिंता करायला महायुती सरकार आहे. मोठे पॅकेजही सरकारने जाहीर केले आहे. कर्जमाफीच्या चर्चेसाठी कडू यांना आंदोलनापूर्वी बोलावण्यात आले होते. कर्जमाफी कशी करायची आणि कोणाला द्यायची या चर्चेत ते सहभागी झाले होते. त्यांना कर्जमाफी देण्याचा शब्दही मुख्यमंत्र्यांनी दिला होता.
मात्र, त्यांना नौटंकीच करायची होती. शेतकऱ्यांच्या सहार घेत त्यांनी आपल्या पुनर्वसनाची सोयीसाठी आंदोलन केले. मुख्यमंत्री स्वतः शेतकऱ्यांसोबत असल्यामुळे त्यांना कोणीही अडचणीत आणू शकत नाही.
बच्चू कडूंनी एकनाथ शिंदे सोबत केलेली 20 मिनिटांची बैठक याचा सार म्हणजे येणाऱ्या काळात बच्चू कडूंचे शिवसेनेत पुनर्वसन असा दावाही आमदार राणा यांनी केली. असा कोणताही शेतकरी असू शकत नाही ज्याचे 75 एकर जागेत हवाई महाल असेल. स्वीमिंग पूलपासून सर्व आधुनिक सुविधा त्यामध्ये उपलब्ध आहेत
पुणे, मुंबई, नाशिक अशा अनेक ठिकाणी असणाऱ्या त्यांची संपत्ती आहेत. त्याचा सर्व डाटा मुख्यमंत्र्यांकडे जमा झाला आहे. थोड्याच दिवसात अवैध संपत्तीचे केसेस बच्चू कडूंवर दाखल होतील. ही अवैध संपत्ती अशाच पद्धतीचे आंदोलन आणि ब्लॅकमेलिंग करून कडू यांनी जमवली असल्याचा खळबळजनक आरोपही रवी राणा यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.