Rohit Patil : रोहित पाटील यांचा सुरेश खाडे यांच्यावर निशाणा; पाण्याचे राजकारण थांबवा अन्यथा...

water scarcity in Tasgaon, Kavthemahankal taluka : दुष्काळाची तीव्रता वाढली असताना तालुक्यांवर अन्याय होत असल्याचे सांगत जलसंपदा विभागाच्या कार्यालयात शेतकर्‍यांसह ठिय्या मारला. अधिकार्‍यांना दालनातच घेराव घालत पाणी दिल्याशिवाय उठणार नाही, अशी भूमिका घेतल्याने वातावरण तणावाचे बनले होते.
Rohit Patil, Vishal Patil
Rohit Patil, Vishal PatilSarkarnama
Published on
Updated on

Sangli News : तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील पाणीटंचाईवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पाटील हे आक्रमक झाले. शेजारच्या तालुक्यांना पाणी मिळते. मात्र, तासगाव, कवठेमहांकाळने कुणाचे घोडे मारले? असा सवाल त्यांनी केला आहे. पाण्याचे राजकारण थांबवा, असे सांगत पालकमंत्री पद जिल्ह्याचे आहे याची आठवण करून देण्याची वेळ आल्याचा टोला सुरेश खाडे यांना लगावला. पाणीप्रश्नी अधिकार्‍यांनाही चांगलेच धारेवर धरीत तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला.

दुष्काळाची तीव्रता वाढली असताना तालुक्यांवर अन्याय होत असल्याचे सांगत जलसंपदा विभागाच्या कार्यालयात शेतकर्‍यांसह रोहित पाटील व काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील ठिय्या मारला. सुमारे दोन अधिकार्‍यांच्या दालनातच घेराव घालत पाणी दिल्याशिवाय उठणार नाही, अशी भूमिका घेतल्याने वातावरण तणावाचे बनले होते.

इतर तालुक्यांना वेगळी वागणूक दिली जाते आणि तासगाव (Tasgaon), कवठेमहांकाळला सापत्नभावाची वागणूक देण्यात येत आहे. दोन्ही तालुक्यांतील शेतकर्‍यांनी मुळात काय वाईट केले आहे. राजकीय हेतूने हे पाणी सोडलं जात नाही. त्यामुळे दुष्काळाच्या भीषण परिस्थितीमध्ये लोकांना त्रास होत आहे, याची विदारक परिस्थिती पाहून पाटबंधारे कार्यालयामध्ये आलो आहे. मात्र, यानंतरही जर सुधारणा झाली नाही, तर आम्ही येणार्‍या काळात पाटबंधारे कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा रोहित पाटील (Rohit Patil) यांनी दिला.

Rohit Patil, Vishal Patil
Nitin Gadkari : नितीन गडकरी अचानक खर्गे, जयराम रमेश यांच्यावर का चिडले?

सिंचन योजनांचे पाणी सोडण्याचे नियोजन तयार आहे, अशी विचारणा अधिकार्‍यांना करण्यात आली, पण त्यांच्याकडे पाणी सोडण्याबाबत पाटबंधारे विभागाकडे कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याचे दिसून आले. केवळ राजकीय सोयीतून आणि निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हे पाणी सोडण्यात येत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री हे एका तालुक्याचे नाहीत, ते जिल्ह्याचे आहेत. हेसुद्धा पालकमंत्र्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, अशी टीकादेखील रोहित पाटलांनी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे (Suresh Khade) यांच्यावर केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सावत्र भावाची वागणूक - रोहित पाटील

सिंचन योजनांसाठी पाण्यासाठी शेतकर्‍यांनी पैसे भरले आहेत. पैसे भरूनही पाणी सोडले जात नसून आम्हाला सावत्र भावाची वागणूक दिली जाते. सर्वसामान्य शेतकरी पाणी मागतोय. ही भूमिका घेऊन आम्ही जलसंपदा विभागाच्या कार्यालयात आलो आहे. पाणी सोडण्याचे नियोजन तत्काळ करण्यात यावे, अन्यथा आगामी काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रोहित पाटील यांनी दिला.

अधिकार्‍यांनी राजकारण करू नये - विशाल पाटील

जिल्ह्यातील शेतकरी अधिकार्‍यांच्या पाणीवाटपाबाबत आक्षेप घेत आहेत. अधिकार्‍यांनी पाण्याचे राजकारण करू नये, असा इशारा काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी दिला. दुष्काळाने जनता होरपळून जात असताना दिलासा देण्याची गरज आहे. पण अधिकारी त्रास देत आहेत.

(Edited by Amol Sutar)

R

Rohit Patil, Vishal Patil
Lok Sabha Election 2024 : अक्षय, युवराज अन् कंगणा भाजपकडून निवडणूक लढणार? 'या' मतदारसंघातून मैदानात उतरू शकतात

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com