

Solapur, 04 January : महाविकास आघाडी ही डुबलेली नौका आहे, त्यामुळे त्यात जाणे आम्ही पसंद केलं नाही. महाविकास आघाडी आज अस्तित्वात नाही. महाविकास आघाडी ही 2024 विधानसभासाठी बनवलेली होती आणि तो आता भूतकाळ आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी म्हटले आहे.
वंचित बहुजन आघाडीने सोलापूर (Solapur) महापालिकेसाठी २२ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यांच्या प्रचारासाठी ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर हे आज सोलापुरात आले होते. प्रचारसभेपूर्वी माध्यमांशी बोलताना त्यांनी नेहमीप्रमाणे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले.
सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) म्हणाले, नागरिकांना निवासासाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे, दलित वस्ती आणि मुस्लिम मोहल्ल्यात विकास रखडला गेला आहे. बिल्डरच्या हेकेखोरीविरोधात आम्ही लढणार असून दर्जेदार आरोग्य सेवा, मनपा शाळेत इंग्लिश स्कूलच्या धर्तीवर शिक्षण देणार आहोत.
बाळासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा सोलापुरातून लोकसभा निवडणुकीत लढवली होती. त्या वेळी जिथं लीड मिळाले, अशा 22 ठिकाणी आम्ही मनापासाठी उमेदवार उभे केले आहेत. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आमचे महापौर निवडून येण्याची शक्यता आहे. आमचं मेन टार्गेट हे जिल्हा परिषद आहे.
बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरण हा त्यांच्यातील वाद आहे. मात्र, पोलिसांनी निरपेक्ष राहून काम करावे. भाजपचे दबावशाहीचे राजकारण आहे, 100 पेक्षा जास्त नगरसेवक हे बिनविरोध निवडून आले आहेत. जेव्हा आंबेडकरवादी नेते भाजपमध्ये जातात, तेव्हा समाज त्यांना थारा देत नाही आणि मी त्यांना गिनत नाही, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.
आमचा आरएसएस विरोधचा लढा हा वैचारिक लढा आहे. 2017 पासून जो भ्रष्टाचार सुरूय तो थांबवा यासाठी महापालिकेचा लढा आहे. आरएसएस प्रमुख मोहन भागवत हे 'एक है तो सेफ है आणि कटेगे तो बटगे' बोलू दे, तेव्हा मी त्यावर बोलेन, असेही सुजात आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
आंबेडकर म्हणाले, मुंबईत काँग्रेस हे ठाकरे बंधूंच्या विरोधात आहे. स्मार्ट सिटी राबवायला स्मार्ट लोक मिळाले नाहीत. एक गार्डन आणि 5 पिलर बांधले की स्मार्ट सिटी होत नाही. सोलापुरात स्मार्ट सिटी हे मोठं स्वप्न दाखवण्यापेक्षा नळ, वीज, रस्ते, पाणी आणि आरोग्य हे दिले असतं तर खूप स्मार्ट काम झालं असतं. सोलापूर टेक्स्टाईल इंडस्ट्री खूप मागे पडली आहे. नवी आयटी इंटरनॅशनल कंपनी सोलापुरात येणे अपेक्षित होते, पण ते झाले नाही.
मी ठाकरेंचा वचननामा बघितला आणि मुंबईत येत्या एक ते दोन दिवसांत आमचाही (वंचित बहुजन आघाडी) वाचननामा येईल. आम्ही 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर विश्वास ठेवला नाही.
मुंबईत वंचितने 16 जागी उमेदवारी दिली नाही कारण, काँग्रेसने हेकेखोरी केल्याचा हा प्रकार आहे. कारण ज्या 16 जागा वंचितला हव्या होत्या त्या त्यांनी आम्हाला दिल्या नाहीत. काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याच्या घरात 6 ते 7 सीट द्यायच्या होत्या, त्यामुळे हा प्रकार घडला. मुंबईत काही ठिकाणी एकत्रित आणि काही ठिकाणी एकत्रित प्रचार करणार, जशी डिमांड असेल तसा प्रचार करणार, असे ही आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.