Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडल्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ चर्चेत रंगले होते. प्रसारमाध्यमाची पत्रकार परिषद झाल्यानंतर मुश्रीफ यांनी बोलता बोलता विधान केले. वरिष्ठांच्या आदेशानुसार महायुतीतील एकोपा दाखविण्यासाठी बैठक घ्या, असे आदेश आले आहेत. त्यासंदर्भात बैठक घेऊन मेळावा घेण्याचे त्यांनी जाहीर केले. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात बैठक होऊन मेळाव्याची तारीख ठरवली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खासदार धनंजय महाडिक होते. (Mahayuti meeting at Kolhapur in the presence of Mushrif-Mahadik)
कोल्हापूरच्या शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत, महायुतीमधील एकोपा आणि सामंजस्याचा आदर्श राज्यासह सबंध देशाला दाखवून देऊया,’ असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. येथील महासैनिक दरबारमध्ये येत्या रविवारी (ता. 14 जानेवारी) दुपारी दोन वाजता महायुतीचा मेळावा होत आहे. हा मेळावा उच्चांकी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुश्रीफ यांनी केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मुश्रीफ म्हणाले की, ‘यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात ‘अबकी बार -४५ पार...’ या ध्येयाने संघटितपणे काम केले पाहिजे. महायुती सरकारने राज्यातील विकासाला गती आणि चालना दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत सर्वसामान्य जनतेच्या विकासाचे आणि संपूर्ण देशाच्या आर्थिक उन्नतीचे फार मोठे कार्य केले आहे. हे कार्य लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे.’
खासदार धनंजय महाडिक म्हणाले की, ‘महायुतीमध्ये भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट यांच्यासह एकूण १५ घटक पक्ष आहेत. या सर्वच पक्षाच्या नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांनी कामाला लागून जिल्हापातळीवरील हा मेळावा यशस्वी केला पाहिजे.
मंदिरांची साफसफाई, रोषणाई करावी
‘मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला कोल्हापुरात महायुतीचा भव्य मेळावा होत आहे. त्यानंतर अवघ्या आठवड्याभरात अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा होत आहे. याचा संदर्भ घेत खासदार धनंजय महाडिक म्हणाले, ‘गेल्या पाचशे वर्षांपासून सबंध देश अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या प्रतीक्षेत होता. हा दिवस जवळ आलेला आहे. त्यानिमित्ताने कार्यकर्त्यांनी गावा-गावांतील विविध देवदेवतांच्या मंदिरांची साफसफाई आणि रोषणाई करावी.
या वेळी आमदार राजेश पाटील, माजी मंत्री भरमूअण्णा पाटील, माजी आमदार के. पी पाटील, माजी आमदार अमल महाडिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष सुजित चव्हाण, रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, राजवर्धन नाईक-निंबाळकर, सत्यजित कदम, राहुल चिकोडे आदी उपस्थित होते.
Edited By : Vijay Dudhale
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.