Shirur Lok Sabha Seat : अजितदादांचा गेम प्लॅन, शिरूरच्या मैदानात कोल्हेंच्या विरोधात पार्थ पवार..

Ajit Pawar Vs Amol Kolhe : 'शिरुरला उमेदवार देणार आणि निवडूनही आणणार ...'
Shirur Lok Sabha Seat
Shirur Lok Sabha Seat Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार समर्थक) खासदार अमोल कोल्हे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आव्हान देत शिरूर मतदारसंघात उमेदवार देणार आणि त्याला निवडून आणणार असा इशारा दिला होता. यानंतर आता शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये पार्थ पवार सक्रीय झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे अमोल कोल्हे यांच्या विरोधात पार्थ पवार शिरूरच्या मैदानात पाहायला मिळणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. (Latest Marathi News)

Shirur Lok Sabha Seat
NCP News: 'जशास तसं उत्तर' कसं द्यायचं यासाठी अजित पवार गट सज्ज !

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सुरुवातीला खासदार अमोल कोल्हे हे अजित पवार यांच्या बाजूने असल्याचे चित्र पाहायला मिळाले. पण लगेचच त्यांनी आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचं जाहीर केलं. यानंतरच्या काळामध्ये अमोल कोल्हे हे कधी अजित पवारांसोबत तर कधी शरद पवारांच्या सोबत दिसले. त्यामुळे कोल्हेंचा नेमका स्टॅन्ड काय आहे हे समजणे अवघड झाले होते. मात्र आता त्यानंतर अजित पवारांनी कोल्हेंना इशाराच देत शिरूर मतदार संघामध्ये उमेदवार देणार आणि निवडून आणून दाखवणार असल्याचा इशारा दिला.

अजित पवारांनी इशारा दिल्यानंतर शिरूर लोकसभा मतदार संघाचा भाग असलेल्या हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये पाहणी दौऱ्यासाठी पोहचले होते. या पाहणी दौऱ्यामध्ये त्यांनी विविध विकास कामांचा आढावा घेतला आणि प्रशासनाला ते त्वरित पूर्ण करण्याचे आदेश दिले. यामुळे अजित पवारांनी शिरुरवर विशेष लक्ष दिल्याचे दिसून आले. यानंतर अमोल कोल्हे यांनीही दंड थोपतात 'बात निकली है तो दूर तक जायेगी,' असं म्हणत आपणही हे आव्हान स्वीकारले असल्याचे दाखवून दिले. शेतकरी आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे त्यांनी अजित पवारांवर हल्लाबोल चढवला.

अजित पवार यांच्या हडपसर दौऱ्यानंतर आता पार्थ पवार देखील हडपसर मध्ये सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज पार्थ पवार हडपसर भागातील राष्ट्रवादीच्या विविध नेत्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेणार आहे. याबाबतचा दौरा त्यांच्याकडून जाहीर देखील करण्यात आला आहे. हडपसर हा भाग शिरूर मतदारसंघात मध्ये येत असून, शिरूरमध्ये विजय मिळवण्यासाठी हा सर्वाधिक महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ मानला जातो.

Shirur Lok Sabha Seat
Ajit Pawar : पार्थ पवारांच्या उमेदवारीबाबत अजित पवार यांचे मोठे विधान

मागील लोकसभा निवडणुकीमध्ये मावळ मतदार संघातून पार्थ पवार यांना पराभव स्वीकारावा लागला यानंतर पार्थ पवार हे फारच कमी वेळा राजकीय व्यासपीठावरती आणि राजकीय भेटीगे गाठी घेताना दिसले. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांच्या भेटीगाठी घेण्यामुळे शिरूर मतदारसंघामधून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक तर नाहीत ना? अशा चर्चांना उधाण आला आहे. त्यामुळे कोल्हेंविरोधात पार्थ पवार असा अजित पवारांचा गेम प्लॅन तर नाही ना? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

असा आहे पार्थ पवारांचा दौरा -

मंगळवार दिनांक 9 जानेवारी 2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ अजित पवार यांचा हडपसर विधानसभा मतदारसंघांमध्ये दौरा असणार आहे.

* सकाळी 9 वाजता पुणे महानगरपालिकेचे मा. नगरसेवक बंडू तात्या गायकवाड यांच्या मुंढवा येथील निवासस्थानी भेट देणार आहेत.

* - 9.30 ते 10:00 या काळात मा. नगरसेविका सुरेखाताई कवडे यांच्या बीटी कवडे रोड येथील निवासस्थानी

* 10:00 ते 13:00 या वेळेत ते भीमनगर येथील मा. नगरसेवक अण्णा म्हस्के यांच्या निवासस्थानी.

4- सकाळी 10:30 ते 11:00 या काळात मा. नगरसेवक शिवाजी पवार यांच्या सोलापूर रोड कॅनॉल परिसरातील निवासस्थानी भेट

* सकाळी 11:00 ते 11.30 या वेळेत मा. नगरसेविका वैशालीताई बनकर यांच्या निवासस्थानी, सातववाडी या ठिकाणी ते भेट देतील

* सकाळी 11.30 ते 12.00 या काळात मा. नगरसेवक योगेश ससाणे यांच्या जनसंपर्क कार्यालयात, ससाणेनगर

* 12.00 ते 12.30 या वेळेत मा. नगरसेवक आनंद अलकुंटे यांच्या वैदूवाडी येथील शंकरमठ मधील जनसंपर्क कार्यालयाला भेट देतील

* दुपारी 12.30 ते 01.00 या काळात रामटेकडी येथील मा. नगरसेवक अशोक कांबळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट

*दुपारी 1.00 ते 1.30 या काळात सय्यदनगर येथील मा. नगरसेवक फारुखनाना इनामदार यांच्या निवासस्थानी भेट

* दुपारी 2 वाजता कोंढवा येथील कार्याध्यक्ष संदीप नाना बधे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com