Sunetra Pawar Video : राष्ट्रवादी काँग्रेसला एकटं पाडलं, सुनेत्रा पवारांनी रणशिंग फुंकलं; म्हणाल्या, 'अजितदादांनी 300 कोटी...'

Sunetra Pawar Buldhana Bank Election : बुलढाणा जिल्हा बँक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मैदानात उतरल्या आहेत.
Sunetra Pawar
Sunetra Pawarsarkarnama
Published on
Updated on

Sunetra Pawar News : बुलढाणा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला एकटे पाडण्यात आले आहे. मात्र, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या मैदानात उतरण्यात असून व्हिडिओद्वारे त्यांनी या निवडणकीच्या मैदानात पॅनले उतरवल्याची माहिती दिली.

सुनेत्रा पवार म्हणाल्या की, 'बुलढाणा जिल्ह्यातील मोठे नेते अजितदादांकडे यायचे आणि आर्थिक मदत करा म्हणून पाठपुरावा करायचे. शेतकऱ्यांच्या या बँकेला नवसंजीवनी मिळावी म्हणून ३०० कोटी रुपयांची मदत दादांनी केली. त्यामुळे ही बँक अवसायनातून बाहेर आल्याची पाहायले मिळाले. आता मात्र या नेत्यांनी आपल्या पक्षाला वगळून इतर पक्षांना सोबत घेतले, याची मला आता खंत वाटते.'

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, 'नेते दादांकडे आर्थिक मदत करा म्हणून पाठपुरावा करायचे. ते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि मी सुद्धा त्याची साक्षीदार आहे. कारण अनेकवेळा मी दादांसोबत असायची त्यावेळी सुद्धा हा विषय मी ऐकत असायचे.'

'ज्या बँकेला दादांनी भरीव मदत केली, त्यांच्याच पक्षाला बाजुला ठेवण्याचे काम त्यांनी केली. त्यामुळे अजितदादांच्या नावाने स्व.अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल या नावाने आपण पॅनल उभं केलं आहे.'

Sunetra Pawar
DCC Bank : जिल्हा बँकेत भाजप-शिवसेनेकडून राष्ट्रवादीचा 'गेम' : अजितदादांनी दिलेल्या 350 कोटींची आठवण करून देत मकरंदआबांचा संताप

आज मतदान

बँकेच्या 21 संचालकांपैकी 12 संचालक बिनविरोध करण्यात आले आहेत. मात्र, राष्ट्रवादीला यामध्ये स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे सिंदखेडराजाचे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार मनोज कायंदे यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादीकडून स्व.अजितदादा पवार शेतकरी पॅनल निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आला आहे. उर्वरीत 9 जागांवर या पॅनलची लढत 'सहकार पॅनल'सोबत होणार आहे.आज रविवारी (ता.23) या निवडणुकीचे मतदान होत आहे.

Sunetra Pawar
Satara Dcc Bank : भाजपच्या एका मंत्र्याला वगळून सातारा जिल्हा बॅंकेसाठी पॅनेल उभारण्याच्या हालचाली : शिवेंद्रराजेंकडे नेतृत्व जाणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com