ZP Nominated Member : झेडपी ‘स्वीकृत’ इच्छुकांनो कामाला लागा, ग्रामविकास मंत्र्यांची मोठी घोषणा : 'येत्या 8-10 दिवसांत जीआर निघणार’

Jaykumar Gore Statement : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्य नियुक्तीसाठी लवकरच जीआर येणार असून, 10 टक्के किंवा किमान पाच जणांना संधी मिळणार असल्याचे जयकुमार गोरे यांनी सांगितले.
ZP Nominated Member Issue
ZP Nominated Member IssueSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 20 April : जिल्हा परिषद, पंचायत समितींमध्ये आता स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होणार आहे. निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्यांच्या दहा टक्के किंवा किमान पाच जणांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी दिली जाणार आहे. ‘स्वीकृत’साठी इच्छूक असलेल्या नेत्यांना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मोठी बातमी दिली आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत स्वीकृत सदस्य निवडीचा जीआर प्रसिद्ध होईल, असे गोरे यांनी स्पष्ट केले.

सोलापूर महापालिकेत माध्यमांशी बोलताना पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी जिल्हा परिषदेच्या स्वीकृत सदस्य पदाबाबत भाष्य केले. ते म्हणाले, जिल्हा परिषद, पंचायत समिती स्वीकृत सदस्यपदाच्या विधेयकावर राज्यपालांची सही झालेली आहे. नियमावली बनवायचे काम सध्या सुरु आहे.

आता मी मुंबईत गेल्यावर उद्या किंवा परवा त्यासंदर्भात बैठक घेणार आहेत. त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्वीकृत सदस्य (ZP Panchayat Samiti Nominated Membar) पदासाठीची नियमावली अंतिम होईल. येत्या आठ ते दहा दिवसांत स्वीकृत सदस्य नियुक्तीचा जीआर निघून जाईल, असेही जयकुमार गोरे यांनी सांगितले.

नऊ मेपर्यंत गटनोंदणी करा

स्वीकृत सदस्यासाठी नामनिर्देशन करताना जिल्हाधिकारी हे मान्यताप्राप्त पक्षांचे किंवा नोंदणीकृत पक्षांचे किंवा गटांचे तौलनिक संख्याबळ विचारात घेणार आहेत. पक्षाच्या किंवा गटाच्या नेत्याशी विचारविनिमय करून पक्षाच्या किंवा गटांच्या संख्याबळाच्या प्रमाणात सभासदांचे नामनिर्देशन करणार आहेत. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गटनोंदणी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

पूर्वी अशी गटनोंदणी करण्यासाठी जिल्हा परिषद/पंचायत समिती निकालाच्या अधिसूचनेच्या तारखेपासून एक महिन्याची मुदत होती. ती तीन महिने केली आहे, त्यामुळे ९ मेपर्यंत गटनोंदणी करता येणार आहे.

ZP Nominated Member Issue
Mahesh Shinde : भाजपच्या बड्या नेत्याचा शिवसेना आमदाराला शब्द : महेश शिंदे जी भूमिका घेतील, त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू...

सोलापूर झेडपीत सात स्वीकृत सदस्य

सोलापूर जिल्हा परिषदेत भाजपचे ३८, राष्ट्रवादी काँग्रेसचे ११, शिवसेनेचे ८, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ५, सांगोला तालुका विकास आघाडीचे तीन, करमाळा तालुका विकास आघाडीचे दोन, तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा एक सदस्य विजयी झालेला आहे. या संख्याबळानुसार सोलापूर जिल्हा परिषदेत सात स्वीकृत सदस्य नियुक्त केले जाऊ शकतात. त्यातील भाजपचे ४, शिवसेना, राष्ट्रवादी व आघाड्यांकडून प्रत्येकी एकाला संधी मिळू शकते.

प्रणिती शिंदेंना टोला

महिला आरक्षण विधेयकाला महिला खासदाराने विरोध करणे आणि त्याचा बडेजाव करणे, हे त्यांच्या (खासदार प्रणिती शिंदे) बौद्धिक ऱ्हासाचे लक्षण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिलांना आरक्षणासाठी सर्व प्रयत्न केले. पण, आरक्षण मिळू दिलं नाही आणि त्याचा आनंद विरोधी पक्ष व्यक्त करत आहेत.

ZP Nominated Member Issue
Mahesh Shinde : भाजपच्या बड्या नेत्याचा शिवसेना आमदाराला शब्द : महेश शिंदे जी भूमिका घेतील, त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू...

आज देशातील महिला भगिनी याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाहीत. मोदींची भूमिका ठाम आहे, विधेयक मंजूर झालं नाही तरी आगामी काळात पुन्हा विधेयक आणून मंजूर केलं जाईल, असेही जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com