
Marathi Hindi Controversy: राज्यात सध्या सुरु असलेल्या मराठी-हिंदी वादावर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ठाकरे बंधुंवर टीका केली आहे. या वादावर सरकारला काहीही करण्याची गरज नाही. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मिळालेला आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. कराड इथं भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हे भाष्य केलं आहे.
लोढा म्हणाले, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मिळालेला आहे. त्यानंतरही कोणी जातीवरून समाजात वाद घालत असेल तर ते यशस्वी होणार नाहीत. पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच्या आयोजनाबाबत ते म्हणाले, "कार्यकर्ते आमचे मालक आहेत. ते आहेत म्हणून आम्ही आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी कार्यकर्ते आहेत म्हणून तुम्ही मंत्री आहात असं सांगीतलं आहे. प्रत्येक मंत्र्यांना दोन जिल्ह्यात प्रत्येक महिन्याला जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार सातारा आणि अहिल्यानगर जिल्हा दिला आहे. या मेळाव्याला मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. त्यांचं म्हणणं आम्ही ऐकून घेतलं. या मेळाव्यात एकही तक्रार आली नाही, सर्व रामराज्य आहे. जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीचं चांगलं नियोजन केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कामबद्दल जेष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी त्यांचं अभिनंदन केलं. यावर लोढा म्हणाले, "देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत. महाराष्ट्रात ना भूकंप, ना सुनामी... फक्त देवा भाऊचं कामच पुढे जाणार आहे.
ऑलिंपिकपदक विजेते खाशाबा जाधव यांनी आजच्या दिवशी ७३ वर्षापूर्वी देशाला पहिलं ऑलिंपिक पदक मिळवून दिलं होतं. यानिमित्त मी, आमदार अतुल भोसले, मनोज घोरपडे यांच्यासह जाधव यांच्या घरी जावून त्यांच्या प्रतिमेस अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली १३ ऑगस्टला मुंबईत अहिल्याबाई होळकर पुण्यतिथीदिवशी खाशाबा जाधवांच्या नावे देशी खेळांचा महाकुंभ आयोजित केला जात आहे. खाशाबांचे चिरंजीव रणजीत जाधव यांनी या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून येण्याचे मान्य केल्याची माहिती मंत्री मंगप्रभात लोढा यांनी यावेळी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.