Operation Sindoor : "दाल में कुछ काला है"; राहुल गांधींच्या आरोपांनंतर संसदेतील '32 तास' ठरणार वादळी! PM मोदीही सभागृहात ठाण मांडणार

Rahul Gandhi : पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर ही मोहीम राबवली. दहशतवाद्यांविरोधात ही मोहीम अद्यापही सुरुच असल्याचं केंद्र सरकारचं म्हणणं आहे.
Prime Minister Narendra Modi And Operation Sindoor
Prime Minister Narendra Modi And Operation Sindoorsarkarnama
Published on
Updated on

Operation Sindoor : पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर ही मोहीम राबवली. दहशतवाद्यांविरोधात ही मोहीम अद्यापही सुरुच असल्याचं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. पण भारत-पाकिस्तान या दोघांमध्ये युद्धबंदी करार झाल्याचं खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं होतं. त्यामुळं ही मोहीम संपली की अद्याप सुरु आहे? असे अनेक प्रश्न विरोधकांना पडले आहेत. त्यामुळं या प्रकरणात "दाल में कुछ काला है" अशी प्रतिक्रिया लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी दिली आहे.

तसंच ऑपरेशन सिंदूरबाबत सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात सविस्तर चर्चा व्हावी अशी मागणीही केली. त्याला सरकारनं प्रतिसाद दिला असून लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात प्रत्येकी १६ तास याप्रकरणावर चर्चा होईल, असं सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ही चर्चा होणार आहे.

Prime Minister Narendra Modi And Operation Sindoor
Kalyan Receptionist Assault Case : रिसेप्शनिस्ट तरुणीला मारहाण प्रकरणात मोठा ट्विस्ट! सीसीटीव्ही फुटेज आलं समोर; नेमकं काय घडलं?

राहुल गांधींनी याप्रकरणात नेमकं काय म्हटलंय?

"ऑपरेशन सिंदूरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अजून उत्तर देतच आहेत. त्यांचं उत्तर देणं सुरु आहे. सरकार एकीकडं म्हणतंय की ऑपरेशन सिंदूर अद्याप सुरुच आहे आणि दुसरीकडं सांगता की आपला विजय झाला. तर दुसरीकडं ट्रम्प सांगत आहेत की, ऑपरेशन सिंदूर मी संपवलं आहे, असं त्यांनी २५ वेळा सांगितलं आहे. म्हणजेच काही ना काही 'दाल मे काला है ना?" असा सवाल राहुल गांधींनी केला आहे. तसंच या प्रकरणावर कोणत्याच देशानं आपल्याला पाठिंबा दिला नाही, त्यामुळं सरकारनं आपल्या परराष्ट्र व्यवहार उद्ध्वस्त केला आहे," अशा शब्दांत राहुल गांधी यांनी सरकारला ऑपरेशन सिंदूरचं नेमकं काय झालंय? याबाबत सभागृहात चर्चा करण्याचं आवाहन केलं आहे.

Prime Minister Narendra Modi And Operation Sindoor
Maharashtra NA Tax : इंग्रजांच्या काळातला NA टॅक्स रद्द केला तरी वसुली सुरुच! पुणे-मुंबईत रहिवाशांना नोटीसा; नेमका घोळ काय?

गांधींच्या आरोपांनंतर ३२ तास ठरणार वादळी

दरम्यान, राज्यसभेच्या बिझनेस अॅडव्हायझरी कमिटीची बैठक आज पार पडली. उपसभापती हरिवंश यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी विरोधकांनी पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर दोन दिवस चर्चेची मागणी केली. या चर्चेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती आवश्यक आहे, अशी मागणीही विरोधी पक्षांनी केली. राज्यसभेतील काँग्रेसचे उपनेते प्रमोद तिवारी यांनी म्हटलं की, विरोधकांनी एकासुरात मागणी केली आहे की, पलहगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर पुढील आठवड्यात चर्चा केली जावी. लोकसभेत यावर चर्चा झाल्यानंतर राज्यसभेतही यावर चर्चा व्हावी.

Prime Minister Narendra Modi And Operation Sindoor
MP Ajit Gopchade News : लग्नाळूंची फसवणूक रोखा ; विवाह नोंदणी वेबसाईटवर नियंत्रण आणा! अजित गोपछडे यांची मागणी

ही सर्वसामान्य चर्चा असावी. यामध्ये कोणताही प्रस्ताव आणता कामा नये. विरोधकांनी या चर्चेमध्ये पंतप्रधानांनी देखील उपस्थित राहावं अशी मागणी केली. त्यावर सरकारनं विरोधकांना आश्वासन दिलं की, पंतप्रधान या चर्चाला जरुर उपस्थित असावेत, अशी मागणीही काँग्रेसचे नेते प्रमोद तिवारी यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे संसदेच्या दोन्ही सभागृहात पहलगाम हल्ला, बिहारमधील मतदार सूचीवरुन विशेष गहन समीक्षा कले जाईल तसंच अन्य मुद्यांवरुन आणि इतर मुद्द्यांवर दररोज गोंधळ निर्माण होत आहे. त्यामुळं वारंवार सभागृहांची कारवाई स्थगित केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com