Walchandnagar News : मित्रपक्षाकडून आपल्याला धमकी दिली जाते, अशी तक्रार भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली होती. त्यावरून धमकी देणाऱ्यांना खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘हर्षवर्धनभाऊंना (हर्षवर्धन पाटील) शिव्या घातल्या, तर गाठ माझ्याशी (सुप्रिया सुळे) आहे,’ असा इशारा दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचा मेळावा इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथे झाला. त्या मेळाव्यात बोलताना सुप्रिया सुळे यांनी धमकी देणाऱ्यांना खडे बोल सुनावले. सत्ता आणि पैशाची मस्ती धमकी देणाऱ्यांना आहे. पण, मस्ती जैसी चढा सकती है...वैसी उतारभी सकते है... मी तुमची ढाल म्हणून उभी राहील, असेही सुळे यांनी स्पष्ट केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मित्रपक्षाच्या नेत्याला शिव्या घालणे, ही इंदापूर (Indapur) आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे का? बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघात अशी दादागिरी यापुढे चालू देणार नाही. तुम्हाला एखाद्याने धमकी दिली तर माझा मोबाईल नंबर द्या. मी तुमच्या पाठीशी ढाल बनून उभी राहीन. धमकी आणि दमदाटीची भाषा आम्ही चालू देणार नाही, असेही सुळे यांनी स्पष्ट केले.
भाजपत प्रवेश करण्यापूर्वी आठ दिवस अगोदर भाजपवाले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यावर भ्रष्टाचार आरोप करत होते. मात्र, भाजपत प्रवेश केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना खासदार करण्यात आले. चव्हाण यांनी जर भ्रष्टाचार केला असेल तर भ्रष्टाचारमुक्त भारताचे काय झाले.? भ्रष्टाचाराचे आरोप खोटे असतील तर अशोक चव्हाण आणि काँग्रेसची भाजपने माफी मागावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, बारामती लोकसभा मतदारसंघातील एमआयडीसीमध्ये शरद पवार यांनी विविध कंपन्या आणल्या. नमो रोजगार मेळाव्यात सहभागी झालेल्या सर्व कंपन्यांचे उद्घाटन शरद पवार यांनी केले होते. तसेच रोजगार मेळाव्यासाठी उभारलेल्या मंडपाचे एक दिवसाचे भाडे ५ कोटी रुपये होते. पालकमंत्री बदलण्यासाठी दिल्लीवारी केली जात असेल तर कांद्याला भाव मिळावा, यासाठी दिल्लीवारी का केली जात नाही
या मेळाव्याला पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने, कामगार नेते शिवाजी खटकाळे, तालुकाध्यक्ष ॲड. तेजसिंह पाटील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, ज्येष्ठ नेते अशोक घोगरे, सागर मिसाळ, अमोल भिसे, छाया पडसळकर, युवकचे तालुकाध्यक्ष अनिकेत निंबाळकर, गणेश धांडोरे उपस्थित होते.
Edited By : Vijay Dudhale
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.