Mangalvedha Nagar Parishad : मंगळवेढा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला 'या कारणामुळे' स्थगिती; दोन डिसेंबरला फक्त नगरसेवकांसाठीच मतदान

Municipal Council president Election 2025 : अपील न्यायालयात प्रलंबित असल्याने मंगळवेढा नगराध्यक्षपदाची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. आता दोन डिसेंबरला केवळ नगरसेवकांचीच निवडणूक होणार आहे.
Mangalvedha Nagar Parishad
Mangalvedha Nagar ParishadSarkarnama
Published on
Updated on
  1. मंगळवेढा नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांविरोधातील अपिले प्रलंबित असल्याने नगराध्यक्ष पदाची निवडणूक स्थगित ठेवण्यात आली असून २ डिसेंबरला फक्त नगरसेवकांची निवडणूक होणार आहे.

  2. रागिनी कांबळे, सुप्रिया जगताप आणि सुनंदा आवताडे यांच्या अर्जांवर झालेल्या सुनावणीत निवडणूक निर्णय अधिकारी यांचा निर्णय न्यायालयाने कायम ठेवला.

  3. चिन्हवाटपाच्या दिवशी अपिलांचा अंतिम निकाल न आल्याने निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय घेतला असला तरी सुनंदा आवताडे यांनी स्थगिती लागू नसल्याचा दावा केला आहे.

Solapur, 28 November : आरक्षण मर्यादेच्या उलंघनामुळे राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीवर टांगती तलवार असतानाच सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. मंगळवेढा नगराध्यक्षपदाबाबत करण्यात आलेले अपिल न्यायालयात प्रलंबित असल्याने नगराध्यक्षपदाची निवडणूक स्थगित ठेवण्यात आली आहे. आता मंगळेवढ्यात येत्या दोन डिसेंबरला केवळ नगरसेवकांसाठीच मतदान होणार आहे.

नगरपरिषद (Nagar Parishad) आणि नगरपंचायतींमधील ज्या पदाच्या अनुषंगानेजिल्हा न्यायालयात अपिल दाखल करण्यात आलेले आहे. त्याची सुनावणी प्रलंबित आहे किंवा संबंधित प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे. पण, त्या प्रकरणांचे आदेश उपलब्ध नाहीत, त्या जागांसाठी २६ नोव्हेंबर रोजी चिन्हांचे वाटप करण्यात आलेले नाही. अशा जागांसाठीची निवडणूक पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात आल्याचे शासकीय आदेशात म्हटले आहे.

मंगळवेढा (Mangalvedha) नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत रागिनी कांबळे, सुप्रिया जगताप, सुनंदा आवताडे या तिघींविरोधात पंढरपूर न्यायालयात तीन अपील दाखल झाले होते. त्या अपिलाचा निकाल गुरुवारी (ता. २७ नोव्हेंबर) सायंकाळी आला आहे, त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी मदन जाधव यांनी दिलेला निकाल पंढरपूर न्यायालयाने कायम ठेवला आहे.

नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबाबत निवडणूक निर्णय अधिकारी मदन जाधव यांनी रागिनी कांबळे यांच्या अर्जावरील आणि नगरसेवक प्रवीण खवतोडे यांच्या अर्जावरील एकच सूचक आहे. खवतोडे यांचा अर्ज अगोदर, तर रागिनी कांबळे यांचा अर्ज नंतर दाखल झाला आहे, त्यामुळे कांबळे यांचा अर्ज रद्द करण्यात आला.

सुप्रिया जगताप व सुनंदा आवताडे यांचा अर्ज मंजूर करण्यात आला होता. त्या विरोधात पंढरपूर येथील न्यायालयात अपील करण्यात आले होते. त्याची सुनावणी दोन दिवस चालली. निवडणूक निर्णय अधिकारी मदन जाधव यांनी मी घेतलेला निर्णय कायद्याला धरून आणि दिलेला निकाल हा योग्य असल्याचे म्हणणे सादर केल्यानंतर रागिनी कांबळे यांचा अर्ज रद्द करण्यात आला.

ॲड संताजी माने यांनी युक्तिवादादरम्यान थेट नगराध्यक्षपदासाठी 2017 मध्ये नवा निवडणूक कायदा लागू करण्यात आला आहे. नगरसेवकपदासाठी जुनाच कायदा अस्तित्वात आहे, त्यामुळे नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी दोन वेगवेगळे कायदे आहेत. नव्या कायद्यानुसार रागिनी कांबळे यांचा अर्ज वैध ठरवावा. सुप्रिया जगताप या प्राध्यापिका असून त्यांना तीन अपत्य असल्याने त्यांचा अर्ज रद्दबातल करावा असा युक्तिवाद ॲड नीलेश ठोकडे यांनी सुनंदा आवताडे यांच्या वतीने केला.

Mangalvedha Nagar Parishad
Baramati election update : बारामतीत मोठी घडामोड; अजितदादा प्रत्येक प्रभाग पिंजून काढत असतानाच 2 जागांवरील निवडणूक लांबणीवर

त्यावर ॲड संताजी माने यांनी हरकतीदरम्यान व सुनावणीदरम्यान दिलेला संस्थेचा पुरावा वेगवेगळा आहे. जगताप यांनी नोकरीचा राजीनामा 29 ऑक्टोबरला दिलेला मंजूर झाला आहे. तीन अपत्यांबाबतचा कोणताही जन्म तारखेचा पुरावा सादर केला नाही. केवळ सोशल मीडियातील फोटोवरून घेतलेली हरकत आहे, त्यामुळे त्यांचे अपील फेटाळण्यात यावे, असा युक्तीवाद मांडला.

सुनंदा आवताडे यांचा मुलगा नगरपालिकेत ठेकेदारी करतो. मुलाच्या नावे सध्या नगरपालिकेची दोन कामे सुरू आहेत. भविष्यात एखाद्या कामासंदर्भात तक्रार आल्यानंतर त्यावर कठोर भूमिका घेण्याबाबत शंका निर्माण होऊ शकते, त्यामुळे त्यांचा अर्ज रद्द करावा, असा युक्तीवाद रागिनी कांबळे यांच्या वतीने ॲड संताजी माने यांनी केला. त्यावर ॲड नीलेश ठोकडे यांनी नगराध्यक्षपदाचा उमेदवार व त्यांच्या मुलाचे रेशन कार्ड 2015 पासून विभक्त आहे त्यामुळे, त्यामुळे संबंधित हरकत चुकीची आहे, असा युक्तिवाद केला.

तीनही उमेदवारांवरील हरकतीची सुनावणी गुरुवारी पूर्ण झाली. चिन्ह वाटप २६ नोव्हेंबर रोजी होते, त्यामुळे चिन्ह वाटपापर्यंत अपिलावरील सुनावणी अपूर्ण होती. तसेच त्याचा अंतिम आदेशही आला नव्हता, त्यामुळे मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्षपदाची निवडणूक स्थगित करण्यात आलेली आहे, त्यामुळे येत्या दोन डिसेंबर रोजी केवळ नगरसेवकांची निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाच्या पुढील आदेशानुसार नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.

अपिलाचा निकाल आल्याचे निवडणूक आयोगाला कळविणार : मदन जाधव

यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी मदन जाधव म्हणाले, ज्यांची अपील आहेत, त्या निवडणुका पुढे ढकलण्यासंदर्भात निवडणूक आयोगाचा निर्णय आहे. मंगळवेढ्यात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराबाबत अपील होते, त्या अपिलाचा निकाल आला आहे, त्याबाबत निवडणूक आयोगाला तत्काळ पत्र पाठवून वेळेत निवडणूक घेण्याबाबत कळविणार आहे.

Mangalvedha Nagar Parishad
Jan Surajya Shakti : 'जनसुराज्य'ने महायुतीत वट दाखवला; चार नगरपालिकेत सत्तेचा दावेदार

नगराध्यक्षपद निवडणूक स्थगितीचा प्रश्नच येत नाही : सुनंदा आवताडे

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ज्या जागांसाठी चिन्हवाटप झाले नाही, त्या जागांचीच निवडणूक स्थगित होऊ शकते. मात्र, नगराध्यक्ष पदासाठी २६ नोव्हेंबर रोजी अधिकृत चिन्हवाटप व्हिडिओ चित्रीकरणासह पूर्ण झाले आहे. त्यामुळे या पदावर आयोगाचा स्थगिती आदेश लागू होत नाही. याशिवाय २७ तारखेला जिल्हा न्यायालयाने दिलेला निकालही निवडणूक प्रक्रियेवर कुठलाही परिणाम करणारा नाही, त्यामुळे नगराध्यक्षपदाची निवडणूक स्थगित करण्याचा प्रश्नच येत नाही. निवडणुकीत अडथळे आणण्याचा प्रयत्न झाला, त्याविरोधात मंगळवेढ्यात जनआंदोलन उभे राहील, असा इशारा नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुनंदा आवताडे यांनी दिला आहे.

  1. प्र. मंगळवेढा नगराध्यक्षपदाची निवडणूक का स्थगित झाली?
    उ: उमेदवारांविरोधातील अपिले प्रलंबित असून चिन्हवाटपाच्या वेळी अंतिम निकाल उपलब्ध नव्हता.

  2. प्र. २ डिसेंबरला कोणती निवडणूक होणार आहे?
    उ: फक्त नगरसेवक पदांची निवडणूक होणार आहे.

  3. प्र. न्यायालयाचा निर्णय काय झाला?
    उ: निवडणूक निर्णय अधिकारी मदन जाधव यांचा अर्जांविषयीचा निर्णय न्यायालयाने कायम ठेवला.

  4. प्र. सुनंदा आवताडे यांनी काय भूमिका मांडली?
    उ: चिन्हवाटप पूर्ण झाल्याने नगराध्यक्ष निवडणुकीवर स्थगिती लागू होत नाही, असा दावा त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com